शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत ३३५७ होर्डिंग्जवर कारवाई

By admin | Updated: October 10, 2016 03:33 IST

पनवेल शहर महानगरपालिकेची स्थापना नुकतीच झाली आहे. महापालिकेचे प्रथम आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे यांनी पदभार सांभाळला आहे

पनवेल : पनवेल शहर महानगरपालिकेची स्थापना नुकतीच झाली आहे. महापालिकेचे प्रथम आयुक्त म्हणून डॉ. सुधाकर शिंदे यांनी पदभार सांभाळला आहे. पालिकेला स्वच्छ, सुंदर, स्मार्ट बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहीन, असे त्यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. त्यादृष्टीने पाऊल उचलण्यास सुरु वात केली आहे. शहरात तीन दिवसांत तब्बल ३ हजार ३५७ होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली आहे.सध्या सर्वत्र नवरात्रौत्सवाची धूम सुरू आहे. उत्सवाच्या औचित्याने सर्वच राजकीय पक्षांनी बॅनरबाजीवर भर दिला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन इच्छुकांनी मोर्चेबांधणीलाही सुरुवात केली आहे. त्यामुळे चौकात, महत्त्वाच्या ठिकाणी, बाजारपेठ परिसरात मोठमोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. त्यामुळे शहर विद्रूप झाले आहे. राजकीय पक्षांव्यतिरिक्त अनेक कोचिंग क्लासेस, स्वयंसेवी संघटना देखील यामध्ये जाहिरातबाजीत मागे नाहीत. या सर्वांवर कारवाईचा बडगा उगारत आयुक्त शिंदे यांनी सर्वांना जोरदार धक्का दिला आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. अनधिकृत होर्डिंग्जची संख्या हजारोपेक्षा जास्त असून यावर कारवाई होत नाही. यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत होते, शिवाय शहराचे विद्रूपीकरण होते. हे विद्रूपीकरण थांबवण्यासाठी अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याबाबत पनवेल शहर महानगरपालिकेचे प्रथम आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुधाकर शिंदे सूत्रेहाती घेतल्यावर प्रथम या होर्डिंग्जला लक्ष्य केले आहे. पालिकेने तीन दिवसांपासून अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पालिकेच्या ६ गाड्या व १० कर्मचारी तसेच ६ अधिकाऱ्यांचे पथक कारवाईत सहभागी आहे. पहिल्या दिवशी १११२, दुसऱ्या दिवशी ८२३ होर्डिंग्ज काढण्यात आले तर शनिवार, ८ आॅक्टोबरला केलेल्या कारवाईत ९९६ होर्र्डिंग्ज काढण्यात आले. यामध्ये १ फूटपासून ४० फुटापर्यंत होर्डिंग्जचा समावेश आहे. सध्या तरी एकूण ३३५७ होर्डिंग्ज काढून झाले असून ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.