शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पाणथळ जागेवर डेब्रिज टाकल्याने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:36 IST

बेलापूर सेक्टर २७चा लोटस तलाव : आयुक्तांनी काम स्थगित करून संबंधितांना बजावली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : बेलापूर विभागातील सेक्टर २७ येथील लोटस तलाव परिसरात डेब्रिज टाकून भराव केला जात आहे. त्यामुळे तलावाची सुरक्षा धोक्यात आल्याची बाब काही पर्यावरणप्रेमींनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आयुक्तांनी तत्काळ गुरुवारी ११ मार्च रोजी या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करून भरारी पथकाच्या टीमला नोटीस बजावली आहे. नवी मुंबई शहर हे समुद्रसपाटीपासून खाली आहे. समुद्राला येणाऱ्या भरतीच्या काळात शहरात पाणी शिरू नये म्हणून सिडकोकडून होल्डिंग पॉण्डची निर्मिती करण्यात आली होती. समुद्रातील उंच लाटांचा विचार करता शहरात ज्या ठिकाणी पाणी शिरू शकते त्या ठिकाणी सिडकोने हे होल्डिंग पॉण्ड उभारले आहेत.  परंतु या होल्डिंग पॉण्डची सफाई न झाल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून, खारफुटी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे स्वच्छता करताना  अनेक अडचणी येत आहेत. 

बेलापूर विभागातील सीवूड सेक्टर २७ परिसरात एक नैसर्गिक तलाव आहे. या तलावात मोठ्या प्रमाणावर कमळ फुलले असून यामुळे सौंदर्यात भर पडली आहे. या परिसरात असलेल्या सिडकोच्या भूखंडावर डेब्रिजचा भराव टाकण्यासाठी सिडकोने महापालिकेकडून परवानगी घेतली असून भराव टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु पाणथळ जागेवर डेब्रिजचा भराव टाकण्यात आला असल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. डेब्रिज टाकण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेतली जाते, त्यामुळे महापालिकेकडे डेब्रिज टाकणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंद असते. त्यानंतर ते डेब्रिज नक्की कोठे टाकतात याकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी धर्मेश बरई यांनी केला आहे. शहरातील पाणथळ जागांवर डेब्रिज टाकण्याचे काम सुरू असून महापालिका प्रशासनाने ‘माझी वसुंधरा’ वाचविण्याची विनंती पर्यावरणप्रेमी धर्मेश बरई यांनी केली आयुक्तांकडे केली होती. 

सिडकोने त्यांच्या मालकीच्या भूखंडावर भराव टाकण्यासाठी परवानगी मागितली होती, त्याअनुषंगाने परवानगी देण्यात आली होती. परवानगीनुसार भराव टाकताना पाणथळ जागा सोडून जमिनीवर भराव टाकणे अपेक्षित आहे. पण, पाणथळ जागेवरदेखील भराव टाकण्यात आला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे डेब्रिज टाकण्याच्या कामाला स्थगिती दिली असून याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी भरारी पथकाच्या टीमला नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आलेला आहे.- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

लोटस तलाव परिसरातील जागा वेटलँड म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. सिडकोने परवानगी मागितली. महापालिकेने तपासणी न करता परवानगी दिली आणि त्याकडे दुर्लक्ष केल्याने पाणथळ जागेवर भराव टाकला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.- सुनील अगरवाल, पर्यावरणप्रेमी 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई