शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गालगतच्या अतिक्रमणावर कारवाई !

By admin | Updated: November 6, 2016 04:05 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या रूंदीकरणाला अडथळा निर्माण करणाऱ्या महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर लवकरच कारवाईचा बडगा उगारला

पनवेल : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या रूंदीकरणाला अडथळा निर्माण करणाऱ्या महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. महापालिकेच्या वतीने या अतिक्रमणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अतिक्रमणे स्वत:हून काढून टाका, किंवा कारवाईला सामोरे जा, असे निर्देश या नोटीसाद्वारे देण्यात आले आहेत. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. वाहतुक कोंडी त्याचबरोबर भविष्याचा वेध घेवून रस्ते विकासमहामंडळाने कळंबोली सर्कल ते कोन या दरम्यान एनएच- महामार्गाचे रूंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कळंबोली अग्निशमन दल, खांदा वसाहत, भिंगारी, काळुंद्रे आणि कोन येथे पूल बांधण्याचे प्रस्तावित आहे. या कामाच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. मात्र महामार्गालगत असलेल्या अतिक्रमणांमुळे या कामाला अडथळा निर्माण होत आहे. यापार्श्वभूमीवर महापालिकेने आता कठोर भूमिका घेत या अतिक्रमणांना नोटीसा बजावल्या आहेत.अनेकांनी या महामार्गालगत बेकायदा दुकाने थाटली आहेत. तर काहींनी हे बेकायदा स्टॉल्स भाडयाने दिले आहेत. त्यावर कलिंगड, पीओपी, फर्निचर, खेळणी,गालीचे विक्र ी करणारे दुकान आणि नर्सरी आदीच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत. खांदा वसाहतीलगत या अतिक्र मणाचे प्रमाण जास्त आहे. महामार्गचे रूंदीकरण करण्याकरीता हे अतिक्र मण हटवणे गरजेचे आहे. त्यासाठी एमएसआरडीसीने खासगी एजन्सी नियुक्त केली आहे. याअगोदर संबधित दुकानदारांना नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. परंतु अतिक्रमणधारकांनी या नोटीसांना कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. आयुक्तांच्या आदेशानुसार पनवेल महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या जाणार्या एनएच- मार्गालगतच्या अतिक्रमणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. संबधितांना हे अतिक्रमण स्वत:हून काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार लवकरच अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येणार आहे. - मंगेश चितळे,उपायुक्त, पनवेल शहर महानगरपालिका.