शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील बांधकामांवर कारवाई

By admin | Updated: August 20, 2015 23:58 IST

औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या नाल्याच्या कडेला अनधिकृतपणे बांधलेल्या झोपड्या आणि दुकानांवर अखेर कारवाई करण्यात आली. शिवसेना

नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या नाल्याच्या कडेला अनधिकृतपणे बांधलेल्या झोपड्या आणि दुकानांवर अखेर कारवाई करण्यात आली. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपासून यासाठी पाठपुरावा केला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर एमआयडीसी प्रशासनाने कारवाई केली. नवी मुंबईमध्ये एमआयडीसी व सिडकोच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले जात आहे. बोनसरी परिसरात नाल्यावर भराव टाकून अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले होते. यामधील एका दुकानाचे उद्घाटनही करण्यात आले होते आणि त्याला राजकीय पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. शिवसेना शाखाप्रमुख महेश कोठीवाले, माजी नगरसेवक रामाशेठ वाघमारे, संतोष नेटके यांनी या अतिक्रमणाविरोधात दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयात तक्रार केली होती. परंतु कारवाई न झाल्यामुळे अतिरिक्त आयुक्त व आयुक्तांकडेही तक्रार केली होती. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडेही वारंवार पत्रव्यवहार केला होता. पालिका व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आणि घेराव घालूनही कारवाईस विलंब होत असल्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. पालकमंत्र्यांनी तत्काळ अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आदेश दिले होते. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर एमआयडीसी प्रशासनाने जोरदार हालचाली करून गुरुवारी बोनसरीतील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.