शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

‘बावखळेश्वर’वरील कारवाई लांबणीवर?

By admin | Updated: May 20, 2017 04:47 IST

पावणे एमआयडीसीतील बावखळेश्वर मंदिरावरील कारवाईला पोलीस बंदोबस्ताचा खोडा बसला आहे. संपूर्ण पोलीस यंत्रणा पनवेल महापालिका निवडणुकीत व्यस्त आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : पावणे एमआयडीसीतील बावखळेश्वर मंदिरावरील कारवाईला पोलीस बंदोबस्ताचा खोडा बसला आहे. संपूर्ण पोलीस यंत्रणा पनवेल महापालिका निवडणुकीत व्यस्त आहे. त्यामुळे या कारवाईसाठी बंदोबस्त देण्यास पोलीस आयुक्तांनी असमर्थता दर्शविल्याचे समजते. याचा परिणाम म्हणून ही कारवाई काही दिवस लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे.बावखळेश्वर मंदिर परिसरातील ३४ एकर जागेची मालकी एमआयडीसीची असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे. त्यानुसार एमआयडीसीने ही जागा ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार एमआयडीसीने काही दिवसांपूर्वी मुख्य प्रवेशद्वार सील करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर बावखळेश्वर मंदिर आणि परिसरातील जागा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने एमआयडीसीने हालचाली सुरू केल्या आहेत. न्यायालयाने २00७ पूर्वीच्या धार्मिक स्थळांना अभय दिले आहे. परंतु बावखळेश्वर मंदिर २00९ मध्ये उभारले आहे. अशास्थितीत एमआयडीसी हे मंदिर तोडणार की, तसेच ठेवणार याबाबत नवी मुंबईकरांत उत्सुकता लागली आहे. असे असले तरी एमआयडीसी प्रशासन हे मंदिर तोडण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्राने दिली. मंदिराचे बांधकाम हटविण्याचा मुद्दा हा अत्यंत संवेदनशील आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस संरक्षण लागणार आहे. परंतु सध्या पनवेल महापालिकेच्या निवडणुका आहेत. येत्या २४ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा व्यस्त आहे. अशा परिस्थितीत मंदिराचे बांधकाम हटविण्याच्या कारवाईला पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्यास पोलीस आयुक्तांनी एमआयडीसीला नकार कळविल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या निवडणुकीनंतरच बावखळेश्वर मंदिराचे बांधकाम हटवून उर्वरित जागा ताब्यात घेण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतल्याचे समजते.सोशल मीडियावर अभियान : बावखळेश्वर मंदिरावर एमआयडीसी कारवाई करणार, या वृत्ताने शहरात खळबळ उडाली आहे. हे मंदिर जतन व्हावे, यासाठी शहरातील भाविकांनी सोशल मीडियावर मोहीम उघडली आहे. फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपवर मंदिरावरील संभाव्य कारवाईचा निषेध करणाऱ्या पोस्ट फिरत आहेत. तसेच सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदविला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत मंदिरावर कारवाई होवू देणार नाही, असा संदेश या पोस्टद्वारे प्रसारित केला जात आहे.