शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

झेब्रा क्रॉसिंगचा रंग उडाल्याने अपघात

By admin | Updated: November 14, 2016 04:32 IST

पामबिच मार्गासह शहरातील मुख्य रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग अदृश्य झाले आहेत. यामुळे सिग्नल लागल्यानंतर नेमके थांबायचे कुठे याबाबत

नवी मुंबई : पामबिच मार्गासह शहरातील मुख्य रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग अदृश्य झाले आहेत. यामुळे सिग्नल लागल्यानंतर नेमके थांबायचे कुठे याबाबत चालकांमध्ये संभ्रम होत आहेत. परिणामी, अपघातांच्या घटना घडत असून चालकांचे वाहतूक पोलिसांसोबत वादाचे प्रकारही वाढत आहेत. अपघात टाळण्यासाठी सर्वच चौक व ज्याठिकाणी पादचारी रस्ता ओलांडतात, अशा ठिकाणी सिग्नल कार्यरत आहेत. अशा सर्वच ठिकाणी सिग्नल लागल्यानंतर वाहनांना थांबण्यासाठी व पादचाऱ्यांना चालण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग तयार केले जातात. काही ठिकाणी केवळ पांढऱ्या रंगाचे पट्टे मारून वाहनांना थांबण्यासाठी मर्यादा निश्चित करून दिली जात असते; परंतु सद्यस्थितीला शहरातील मुख्य तसेच विभाग अंतर्गतच्या रस्त्यांवरील हे पांढरे पट्टे तसेच झेब्रा क्रॉसिंग अदृश्य झाले आहेत. त्यांचा रंगच उडालेला असल्यामुळे अगदी दिवसाही हे पट्टे चालकांच्या नजरेस पडत नाहीत. त्यामध्ये पामबिच मार्गाचाही समावेश आहे. सिग्नलच्या ठिकाणचे पांढरे पट्टेच दिसेनासे झाल्यामुळे त्याठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी पामबिच मार्गावर एनआरआय येथे याच कारणामुळे एक अपघात झाला. त्यामध्ये एक महिला थोडक्यात मृत्यूच्या दाढेतून बचावली; परंतु दोन्ही अपघातग्रस्त वाहनचालकांनी पोलिसांसमक्ष एकमेकांविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगून प्रकरण मिटवले. मात्र, शहरात बहुतांश ठिकाणी रोज अशा प्रकारच्या घटना झेब्रा क्रॉसिंगचा रंग उडाल्याने घडत आहेत. त्याकडे पालिका व वाहतूक पोलीस या दोन्ही प्रशासनांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.रस्त्याचे दुभाजक तसेच झेब्रा क्रॉसिंगची रंगरंगोटी पालिकेमार्फत केली जाते. त्यानुसार रंग उडालेल्या झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी रंगकाम करण्याचे पालिकेला कळवले असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र, पावसाळ्याच्या कारणावरून लांबणीवर गेलेल्या या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. परिणामी, सिग्नलच्या ठिकाणी वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. यामुळे वाहनचालक व वाहतूक पोलीस यांच्यात वादाचे प्रकारही घडत आहेत. पांढरा पट्टा नसल्यामुळे सिग्नल लागल्यावर नेमके थांबायचे कुठे हे कळत नसल्याचे चालकांकडून पोलिसांना सांगितले जात आहे, तर नकळत अथवा जाणिवपूर्वक काहीसे पुढे येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. वाशीतील शिवाजी चौक व कोपरखैरणेतील रा. फ. नाईक चौकात याच कारणामुळे वाहतूककोंडीही होत आहे. त्याठिकाणी सिग्नल ओलांडून पुढे येऊन थांबणाऱ्या वाहनांना आवरताना वाहतूक पोलिसांचीही दमछाक होत आहे. (प्रतिनिधी)