शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या स्टंटमुळे होताहेत अपघात

By admin | Updated: March 21, 2016 02:02 IST

वाशीतील मिनी सी शोर परिसरात वेगाने कार चालवल्याने अपघात होत आहेत. पर्यटनाच्या बहाण्याने त्या ठिकाणी येणारे काही उत्साही तरुण वाहनांच्या रेस लावत असल्याने हे अपघात होत आहेत

नवी मुंबई : वाशीतील मिनी सी शोर परिसरात वेगाने कार चालवल्याने अपघात होत आहेत. पर्यटनाच्या बहाण्याने त्या ठिकाणी येणारे काही उत्साही तरुण वाहनांच्या रेस लावत असल्याने हे अपघात होत आहेत. अशाच एका प्रकारात रविवारी कारच्या अपघाताची घटना घडली.वाशीतील मिनी सी शोर हे शहरातील पर्यटनाचे क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. मात्र काही उत्साही तरुणांची गर्दी पर्यटकांना त्रासदायक ठरत आहे. शहराच्या विविध ठिकाणचे तरुण स्वत:च्या दुचाकी अथवा कार अशा वाहनांसह त्या ठिकाणी जमतात. यावेळी हौसेखातर त्यांच्यामध्ये रेस लावण्याचे प्रकार घडत आहेत.धूम स्टाईलने पळवल्या जाणाऱ्या वाहनांमुळे ध्वनिप्रदूषणासह पादचाऱ्यांना दुखापतीची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे यापूर्वी वाहतूक पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाया देखील केलेल्या आहेत. त्यानंतरही मिनी सी शोरच्या मार्गावर वेगात वाहन पळवण्याचे प्रकार सुरूच आहेत. रविवारी दुपारी अशाच एका प्रकारात कारचा अपघात झाला. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ही कार रस्त्यालगतच्या झाडीमध्ये घुसली. दुभाजक ओलांडून कार मार्गाबाहेर गेल्यामुळे कारचे नुकसान झाले आहे. मात्र अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळीच कार सोडून पळ काढला. (प्रतिनिधी)