शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वसुली बाबूचे गांजा विक्रेत्यांना अभय

By admin | Updated: October 23, 2016 03:28 IST

अमली पदार्थविरोधी पथकाच्या धडक कारवाईनंतरही गांजा व इतर अमली पदार्थांची विक्री पूर्णपणे बंद होवू शकली नाही. पोलीस दलामधील काही घरभेद्यांमुळेच अवैध

- नामदेव मोरे, नवी मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाच्या धडक कारवाईनंतरही गांजा व इतर अमली पदार्थांची विक्री पूर्णपणे बंद होवू शकली नाही. पोलीस दलामधील काही घरभेद्यांमुळेच अवैध व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहेत. परिमंडळ एकमध्ये बेलापूर ते दिघापर्यंत गांजा, गुटखा व इतर अवैध व्यावसायिकांकडून बाबू वसुली करत असल्याची चर्चा आहे. या वसुली बाबूविषयी पोलीस महासंचालकांपासून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाणार आहे. ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून शहरातील अनेक गांजा विक्री केंद्रांचे वास्तव समोर आणल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने धाडसत्र सुरू केले आहे. गांजा, एमडी व इतर अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या २५ पेक्षा जास्त माफियांना गजाआड केले आहे. हरिदास विधाते ऊर्फ टारझन, अशोक पांडे यांच्यासह अनेक माफिया गजाआड गेले आहेत. पण यानंतरही गांजा विक्री कमी झालेली नाही. टारझन व त्याचा मुलगा तुरुंगात गेल्यानंतर भाजी मार्केटमधील त्याच्या अड्ड्यांवर विकी नावाच्या विक्रेत्याची मुले गांजा विकत आहेत. धान्य मार्केटजवळील झोपडपट्टीमधील लालीचा अड्डा अद्याप एकही दिवस बंद झाला नाही. महापालिका व सिडकोने झोपड्या हटविल्या तरी दुसऱ्याच दिवशी पुन्हा तिथे गांजा विकला जात आहे. राजा घासवाल्याचा फळ मार्केट व इंदिरानगरमधील अड्डा बंद झाला तरी हनुमाननगर व आंबेडकर नगरमध्ये गांजा विक्री सुरूच आहे. के के आर रोडवर लंगडा अशोक बाबाचा मृत्यू झाल्यानंतर तेथे विकीने गांजा विक्री सुरू केली आहे. तुर्भे महापे रोडवर वारलीपाडा येथे झोपडीमध्ये एक महिला गांजा विकत आहे. नेरूळमधील बालाजी मंदिराच्या पायथ्याशीही अमली पदार्थांची विक्री सुरू आहे. याशिवाय मुकुंद कंपनीजवळही गांजा विक्री होत आहे. शहरात अमली पदार्थांसह मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीही होत आहे. गुजरातवरून भाजीच्या गाडीतून गुटखा एपीएमसी परिसरात आणला जातो. तेथून तो नवी मुंबईत सर्व पानटपऱ्यांना पुरविला जात आहे. ‘लोकमत’ने पानटपरीचालकांना व गांजा विक्री करणाऱ्यांना याविषयी विचारणा केली असता धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. अनेक विक्रेत्यांनी साहेब हा धंदा पोलिसांच्या मर्जीशिवाय चालवताच येत नाही. महिन्याला त्यांचा वाटा द्यावाच लागतो. याशिवाय अनेक वेळा इतर कारणांसाठीही वसुली केली जाते. एपीएमसी, तुर्भे व इतर काही ठिकाणी कोणाला पैसे द्यावे लागतात याविषयी विचारणा केल्यानंतर क्राइमवाला बाबू आमच्याकडून पैसे घेत असल्याचे सांगण्यात आले. सर्व अड्ड्यांची माहिती त्याला आहे. नवीन कुठे कोणी काही सुरू केले तरी त्याला सर्व तपशील मिळत असतो. अनेक वर्षांपासून त्याच्याकडेच वाटा दिला जात असल्याचे सांगण्यात आले. वसुली बाबूचे व इतर अनेक वसुली एजंटचे मोबाइल संभाषण तपासले तरी सर्व ठिकाणची माहिती समोर येईल, असे सांगितले जात आहे. हमारा सर फिरेला नही गुटखा व गांजा विक्रेत्यांशी ग्राहक म्हणून चर्चा केली असता परिमंडळ एकमध्ये बाबू वसुली करत असल्याचे सांगितले. यावर काहीही सांगू नका, पोलीस असे कसे करतील. डोके फिरल्यागत सांगू नका असे बोलल्यानंतर काहींनी साहेब हमारा सर फिरेला नही असे सांगितले. हा व्यवसाय चोरीचा असला तरी तो चोरून व पोलिसांच्या नजरा चुकवून करता येत नसल्याचेही अनेकांनी मत व्यक्त केले आहे. आयुक्तांसह पोलीस महासंचालकांकडे तक्रारवसुली बाबूचा संचार सीबीडी ते दिघापर्यंत आहे. प्रत्येक टपरी, गांजा विक्रीचा अड्डा याची माहिती त्याला आहे. ठरलेला वाटा त्याला द्यावाच लागत आहे. त्याचा मोबाइल नंबर व माहिती पोलीस आयुक्तांसह पोलीस महासंचालकांना देण्यात येणार असून त्याचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली जाणार असल्याची माहिती काही जणांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. पोलिसांसह मनपाचेही दुर्लक्ष एपीएमसीमधील बहुतांश सर्व पानटपऱ्यांवर गुटखा विक्री भाजी मार्केट, आंबेडकर नगर, नेरूळ, तुर्भे स्टोअर्समध्ये गांजा विक्री बीट मार्शल व इतर पोलिसांना माहिती असूनही कारवाई नाहीप्रत्येक बार व हॉटेलबाहेर अनधिकृत पानटपरीमाहिती असूनही कारवाई होत नसल्याबद्दल नागरिकांची नाराजी