शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा अजब न्याय

By admin | Updated: November 16, 2015 02:06 IST

घरगुती शौचालय बांधण्याची ऐपत नसलेल्या व सरकारी शौचालयाचा वापर करणाऱ्या कुटुंबांना आर्थिक साहाय्य न देता उघड्यावर शौचास जाणाऱ्या कुटुंबांसाठी मनपाच्या माध्यमातून

भिवंडी : घरगुती शौचालय बांधण्याची ऐपत नसलेल्या व सरकारी शौचालयाचा वापर करणाऱ्या कुटुंबांना आर्थिक साहाय्य न देता उघड्यावर शौचास जाणाऱ्या कुटुंबांसाठी मनपाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासन मदत करणार असल्याची माहिती मिळाल्याने नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. शहरातील यंत्रमाग व मोती कारखाने तसेच परिसरातील गोदामक्षेत्र यामुळे शहरात कामगार वस्त्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. झोपडपट्टी व लहानमोठ्या खोल्यांत राहणाऱ्या कुटुंबांसाठी शहरात ३०० पेक्षा जास्त सार्वजनिक शौचालये आहेत. त्यात जाण्यासाठी प्रत्येक कुटुंब दैनंदिन २०-३० रुपये खर्च करीत आहे. ही लूट कायम ठेवून महानगरपालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून उघड्यावर शौचास जाणाऱ्या कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करणार आहे. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार उघड्यावर शौचास जाणाऱ्या कुटुंबांची संख्या ५८५६ आहे. त्यापैकी मनपाने केलेल्या सर्वेक्षणात २४९८ कुटुंबांनी आपल्या घरात शौचालय बांधण्यासाठी अर्थसाहाय्याची मागणी केली आहे. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला केंद्र शासन ४ हजार, राज्य शासन ८ हजार व मनपा ५ हजार रुपये देणार असून त्याव्यतिरिक्त आलेला खर्च कुटुंबाने करावयाचा असल्याची माहिती मनपाच्या स्वच्छता विभागाने दिली. मनपाच्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करणारी अनेक कुटुंबे शहरात असून त्यांची वैयक्तिक शौचालय बांधण्याची ऐपत नसल्याने त्यांना केवळ शौचालयासाठी दरमहा ६०० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)