शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

मोरबेची ९५ एकर जमीन गायब

By admin | Updated: March 6, 2016 02:16 IST

धरण विकत घेतले तेव्हा तेथील १९५ एकर जमीनही मनपाच्या ताब्यात होती. परंतु आता १०० एकर जमीन असल्याचा उल्लेख प्रशासनाने केला आहे

नवी मुंबई : धरण विकत घेतले तेव्हा तेथील १९५ एकर जमीनही मनपाच्या ताब्यात होती. परंतु आता १०० एकर जमीन असल्याचा उल्लेख प्रशासनाने केला आहे. उर्वरित ९५ एकर जमीन कुठे गेली, असा प्रश्न शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी यांनी उपस्थित केला आहे.अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी मढवी यांनी पालिकेच्या अनागोंदी कारभारावर टीका केली. मोरबे धरण परिसरातील ९५ एकर जमीन गायब झाली आहे. धरण विकत घेताना त्या परिसरातील १२५ एकर जमीन पालिकेच्या ताब्यात असल्याचे तत्कालीन कार्यकारी अभियंता खाडीलकर यांनी सांगितले होते. फेब्रुवारी २०११ मध्ये धरण परिसरात ३७५ कोटी रुपये खर्च करुन सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा ठराव मंजूर केला होता. या प्रस्तावमध्ये धरण परिसरात १२५ एकर जमीन असल्याचा उल्लेख केला होता. ६ ते ७ वर्षांत ७० एकर जमीन अचानक गायब कशी झाली, अशी विचारणा केली. २०१६ -१७ या अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी मोरबेला १०० एकर जमीन असल्याचा उल्लेख केला आहे. एकूण ९५ एकर जमीन कोणत्या घशात घातली, कोणाचे फार्महाऊस तेथे बांधले जाणार आहेत, अशी विचारणा केली.सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने एसपीव्ही प्रणालीला विरोध करून स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला विरोध केला होता. परंतु यांनीच मोरबे परिसरामध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविताना एसीपीव्हीला मंजुरी दिली आहे. सत्ताधारी सोयीप्रमाणे भूमिका घेत असल्याची टीकाही त्यांनी केली. जनतेच्या पैशाची सुरू असलेली लूट थांबविण्याची मागणी त्यांनी केली.