शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के आरक्षणातून ८२ विद्यार्थी वंचित

By admin | Updated: August 31, 2016 03:18 IST

शासनाने इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या खासगी प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांमधून अनुसूचित जाती आणि दुर्बल घटकांतील मुलांना प्रवेश मिळावा

सिकंदर अनवारे,  दासगावशासनाने इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या खासगी प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांमधून अनुसूचित जाती आणि दुर्बल घटकांतील मुलांना प्रवेश मिळावा याकरिता शाळांच्या एकूण संख्येपैकी २५ टक्के आरक्षणाची योजना अमलात आणली. या वर्षीपासून या योजनेतून लाभ घेण्याकरिता आॅनलाइन प्रक्रियेद्वारे स्वत: पालकांनी अर्ज दाखल करावयाचे होते. मात्र सर्वच पालकांपर्यंत हा संदेश न गेल्याने आणि खासगी संस्थांनी आदेश निघताच हाताला घडी घालून बसण्याचा प्रकार केला. यामुळे महाड तालुक्यातील ८२ जागा रिक्त आहेत, याबाबतची माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे.शासनाच्या सर्व योजना या शाळांमार्फतच राबविल्या जातात. मात्र या वर्षीपासून २५ टक्के आरक्षण ही योजना आॅनलाइन करण्यात आली आहे. खासगी पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या तसेच आर्थिक दुर्बल घटक, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना देखील प्रवेश मिळावा याकरिता ही योजना २०१२ मध्ये सुरू के ली. प्रतिवर्षी शाळांकडून हे प्रस्ताव तयार करून शिक्षण विभागाकडे पाठवले जात होते. मात्र यावर्षी शासनाने यात बदल करून आॅनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. पालकांनी स्वत: हे अर्ज दाखल करावयाचे आहेत. मात्र अनेक पालकांपर्यंत हा संदेश न गेल्याने तसेच आॅनलाइन प्रक्रियेबद्दल माहिती नसल्याचे अर्ज चुकीचे जाणे, अर्ज सादर न होणे, अर्जच न भरणे असे प्रकार घडले. यामुळे महाड तालुक्यात या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. शासनाकडून पैसे उशिराने मिळेल या शंकेतून अनेक शाळांनी पालकांनी अर्ज दाखल करावयाचे असा आदेश निघताच यातून सुटकेचा नि:श्वास सोडत तोंड बंद ठेवण्याचा प्रकार केला आहे. यामुळे महाड तालुक्यात २५ टक्के आरक्षणातून अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत.खासगी संस्था चालकांकडून योजना सुरू झाल्यापासून असाच प्रकार सुरू आहे. महाड पंचायत समिती शिक्षण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार प्रतिवर्षी शाळांकडून वंचित घटक उपलब्ध नाहीत, अर्ज प्राप्त झाले नाहीत अशी कारणे पुढे केली जात आहेत. प्रत्यक्षात आजही या शाळांमधून वंचित तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील मुले शिक्षण घेत आहेत. नऊ शाळांचा योजनेत समावेश : महाड तालुक्यात या योजनेमध्ये ९ शाळा बसतात. यामध्ये कोकण एज्युकेशन सोसायटीची दगडूशेठ पार्टे इंग्रजी माध्यमाची पूर्व प्राथमिक शाळा, समर्थ रामदास विद्यालय, एमआयडीसी, एस. एस. कदम इंग्रजी माध्यम मराठी शाळा बिरवाडी, हिरवळ एज्युकेशन ट्रस्टची इंग्लिश मिडियम स्कूल चांभारखिंड, धर्मवीर दिघे विद्यालय बिरवाडी, मॉडर्न इंग्लिश स्कूल चोचिंदे, संस्कारधाम विद्यालय इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक शाळा खरवली, श्रीगणेशनाथ महाराज संस्थान न्यू इंग्लिश स्कूल पडवी, झोलाई इंग्लिश स्कूल विन्हेरे या शाळांचा समावेश होतो.