शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीमधील व्यापाºयाची ७९ लाखांची फसवणूक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 06:30 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाºयाकडून १०० टन डाळ खरेदी करून पैसे न दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. तब्बल ७९ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाºयाकडून १०० टन डाळ खरेदी करून पैसे न दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. तब्बल ७९ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एपीएमसीजवळील ग्रोमा हाउस इमारतीमधील प्रफुल्लचंद वसनजी आणि कंपनीमध्ये नोकरी करणाºया भावेश मडीयार यांनी याविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. कंपनी डाळी व कडधान्याची आयात-निर्यात करण्याचा व्यवसाय करत आहे. कंपनीने मागविलेला माल कमिशन घेवून इतरांना विकण्याची जबाबदारी मडीयार यांच्यावर आहे. मार्केटच्या नियमाप्रमाणे कोणत्याही पार्टीला माल विक्री केल्यानंतर ३० दिवसांमध्ये आरटीजीएसद्वारे कंपनीच्या खात्यावर जमा करणे आवश्यक असते. २०१३ मध्ये त्यांची ओळख हैदराबादमधील स्वस्तिक कार्पोरेशनचे मालक व डाळीचे एजंट शिवराज पाटील, संतोष पाटील यांच्यासोबत झाली होती. त्यांच्यासोबत व्यवसाय सुरू केला. डाळींची विक्री झाल्यानंतर दहा दिवसांमध्ये ते आरटीजीएसद्वारे पैसे देत होते. २०१५ मध्ये शिवराज पाटील यांनी १०० टन मसूर डाळ खरेदीची आॅर्डर दिली होती. मडीयार यांनी प्रफुलचंद वासनजी यांच्यामार्फत ईटीसी अगारे प्रोसेसिंग कंपनीच्या माध्यमातून डाळ खरेदी केली व संतोष व शिवराज पाटील यांच्या सांगण्यावरून तो संगमेश्वर ट्रेडर्स मार्केट यार्ड औरद, लातूर यांना पाठविली.डाळ दिल्यानंतर नियमाप्रमाणे संंबंधितांनी ३० दिवसांमध्ये पैसे जमा करणे आवश्यक होते. परंतु एक महिन्यापेक्षा जास्त दिवस झाल्यानंतरही पैसे दिले नाहीत. यामुळे संगमेश्वर ट्रेडर्सचे मालक दिनेश पाटील यांच्यासोबत संपर्क केला. परंतु त्यांनी प्रफुल्लचंद्र वसनजी यांच्याकडून कोणताही माल आला नसल्याचे स्पष्ट केले. शिवराज यांच्याशी संपर्क केल्यानंतर पैशासाठी संगमेश्वर ट्रेडर्सला फोन करण्यास सांगितले. त्यांच्याविषयी संशय आल्याने त्यांनी विरू रोडलाईन्सकडे चौकशी केली. त्यांनी शिवराज यांनी माल लातूर ऐवजी हैदराबादला पाठविण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. यामुळे संंबंधित व्यक्ती फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाल्याने मडीयार यांनी तक्रार केली असून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.