शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला ७५.५३ कोटींचे अनुदान!

By admin | Updated: January 18, 2016 02:21 IST

महानगरपालिकेला स्थानिक संस्था करापोटी (एल.बी.टी.) शासनाकडून जानेवारीकरिता ७५.५३ कोटी इतके अनुदान मिळणार आहे.

नवी मुंबई : महानगरपालिकेला स्थानिक संस्था करापोटी (एल.बी.टी.) शासनाकडून जानेवारीकरिता ७५.५३ कोटी इतके अनुदान मिळणार आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच उत्तम करवसुली प्रणाली कार्यान्वित केल्याने महापालिकेला हे अनुदान प्राप्त झाले आहे.महाराष्ट्र शासनाने १ आॅगस्ट १५ पासून अंशत: स्थानिक संस्था कर रद्द केला. सद्यस्थितीत ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांकडून स्थानिक संस्था कर वसूल करण्यात येतो. यामध्ये होणारे महापालिकेचे आर्थिक नुकसान भरु न काढण्यासाठी शासनाकडून हे अनुदान देण्यात येते. त्यानुसार शासनाकडे जुलै महिन्यात उपलब्ध असणा-या माहितीस अनुसरु न महापालिकांसाठी अनुदान जाहीर करण्यात आले होते. नवी मुंबई ही मुंबई वगळता राज्यात इतर महानगरपालिकांएवढीच मोठी व अनेक नागरी सुविधांमध्ये अग्रेसर असणारी महानगरपालिका मानली जाते. काही तांत्रिक कारणांमुळे आॅगस्ट ते डिसेंबर २०१५ या ५ महिन्यांच्या कालावधीकरिता महानगरपालिकेस मिळणाऱ्या साधारणत: ३५ कोटी अनुदान रकमेपैकी केवळ ११.५० कोटी इतकेच अनुदान महानगरपालिकेस जाहीर झाले. आगामी ३ महिन्यांचे अनुदान जाहीर करताना शासनाने सर्व बाबींचा वस्तुस्थितीदर्शक आढावा घेऊन महानगरपालिकेस देय असलेले अनुदान व मागील ५ महिन्यांच्या फरकासह थकीत अनुदान जाहीर केले. म्हणजेच महिन्याला ७५.३३ कोटी इतके अनुदान जाहीर केले आहे. महानगरपालिकेची करवसुली कार्यपध्दती लेखाधारित पध्दतीवर आधारीत उपकर स्वरु पात असल्याने आणि स्थानिक संस्था कर हे उपकर पध्दतीचेच सुधारित रुप असल्याने महानगरपालिकेची वसुली सर्वोत्तम आहे. ५ महिन्यांत थकीत वसुली व विद्यमान वसुली यावर काटेकोर लक्ष दिले तसेच शिस्तबध्द आर्थिक नियोजन केले आहे. यंदा महानगरपालिका ८०० कोटीपेक्षा जास्त वसुली करेल असा विश्वास स्थानिक संस्था कर उपआयुक्त उमेश वाघ यांनी व्यक्त केला आहे.