शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सरासरी ७५ टक्के मतदान

By admin | Updated: February 22, 2017 06:54 IST

रायगड जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सुमारे ७५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज

अलिबाग : रायगड जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सुमारे ७५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १८६ तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३८८ असे एकूण ५७४ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद झाले. जिल्ह्यात काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने तेथील मतदान यंत्रे तातडीने बदलण्यात आली. जिल्ह्यामध्ये सर्वत्र शांततेत मतदान पार पडल्याचा दावा प्रशासनाने केला. २३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अलिबाग तालुक्यात सरासरी ७४ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात मतदार संघ, तर १४ पंचायत समितीच्या जागांसाठी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी मतदारांच्या लांबच लांब रांगा मतदान केंद्राबाहेर लागल्या होत्या. दुपारी प्रचंड उन्हाच्या झळा असल्याने मतदान केंद्राबाहेरील गर्दी काही अंशी कमी झाली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अलिबाग तालुक्यात ६३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारनंतर पुन्हा मतदार उत्स्फूर्तपणे मतदानाला जात असल्याचे दिसून आले. पुढील दोन तासांमध्ये मतदारांचा मतदानाचा ओघ पाहता सुमारे ७४ टक्के मतदान झाल्याचा अंदाज अलिबागचे तहसीलदार प्रकाश सकपाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. तसेच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. अलिबाग तालुक्यात शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, सुप्रिया पाटील, अलिबागचे आमदार सुभाष पाटील, शेकापच्या उमेदवार सुश्रूता पाटील, चित्रा पाटील, शिवसेनेचे महेंद्र दळवी, थळ मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवार मानसी दळवी, काँग्रेसच्या शहापूर मतदार संघातील उमेदवार उज्ज्वला पाटील, वैभव पाटील यांच्यासह काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर, उमेदवार राजा ठाकूर, आप्पा थळे यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या कें द्रांवरीलमतदान यंत्रांमध्ये बिघाडच्रोहा तालुक्यातील नागोठणे जिल्हा परिषद गटातील सुकेळी -२ मतदान केंद्रातील मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान सुरू होण्याआधीच तेथील मतदान यंत्र बदलण्यात आले होते. अलिबाग तालुक्यातील मापगाव, बेलोशी, कुÞडूर्स गटातील भोनंग, बोडणी, ताडवागळे केंद्रातील मतदान यंत्र बदलण्यात आले. मतदान यंत्र बदलताना त्या-त्या मतदान यंत्रामध्ये अनुक्रमे १६,३०० आणि २०७ मतदारांनी मतदान के ले. म्हसळातील पाबरे खारगाव, पाबरे देवघर कोंड केंद्रातील मतदान यंत्रे बदलली. उरणमधील विंधणे गणातील चिले गावठाण मतदान केंद्रातील मतदान यंत्रही बदलली. पनवेलमधील गव्हाण गटातील उलवे, गव्हाण बेलपाडा, गव्हाण, डेरवली आणि वहाळ पंचायत समितीमधील मोरावे केंद्रातील यंत्रे तांत्रिक बिघाडामुळे बदलली. सुधागडमधील पाली नाडसुर गणातील सिध्देश्वर बुद्रुक केंद्रामधील यंत्रात ४१३ मतदारांनी मतदान केले, त्यानंतर ते बदलले.