शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यात ७० टक्के मतदान

By admin | Updated: February 22, 2017 06:47 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकरिता मंगळवारी मतदान झाले. कर्जत तालुक्यात सकाळी मतदान

कर्जत : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकरिता मंगळवारी मतदान झाले. कर्जत तालुक्यात सकाळी मतदान अगदी धिम्या गतीने होत होते. मात्र, दुपारनंतर सर्वच मतदान केंद्रांवर मतदानाचा वेग वाढला व तालुक्यात सुमारे ७० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा निवडणूक विभाग तर पंचायत समितीचे बारा निर्वाचक गण आहेत. तालुक्यातील १७२ मतदार केंद्रांवर १ लाख ३१ हजार १६१ मतदार असून त्यामध्ये ६७ हजार ८४३ पुरु ष मतदार, तर ६३ हजार ३१८ महिला मतदार आहेत. सकाळी ७.३० वाजता मतदानाला प्रारंभ झाला. मात्र, तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर साडेअकरापर्यंत ११ ते १५ टक्केच मतदान झाले होते. दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली आणि मतदानाचा वेग वाढला. दुपारी ४पर्यंत ७१ हजार ७५१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये ३७ हजार ०६७ पुरुष मतदारांचा तर ३४ हजार ६८४ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदान संपेपर्यंत ७० टक्के मतदान होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन प्रभाग अनुसूचित जमातीकरिता आरक्षित असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुक उमेदवारांची निराशा झाली. त्यामुळे मतदान केंद्राच्या परिसरात त्यांची उपस्थिती फक्त नावापुरतीच दिसत होती. बीड बुद्रुक जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या वेणगाव पंचायत समिती निर्वाचक गणात मोठ्या वेणगाव गावात राष्ट्रवादी- शेतकरी कामगार पक्ष-स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आघाडीच्या व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ हाणामारी झाल्याची घटना घडली. ही घटना वगळता तालुक्यात मतदान शांततेत पार पडले.