शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शिशुवर्गाच्या शुल्कात ५० टक्के वाढ

By admin | Updated: March 30, 2016 01:52 IST

कळंबोलीतील कारमेल शाळेतील केजीच्या शुल्कात ५० टक्क्याने वाढ करण्यात आल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी ही वाढ

पनवेल : कळंबोलीतील कारमेल शाळेतील केजीच्या शुल्कात ५० टक्क्याने वाढ करण्यात आल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी ही वाढ करण्यात आल्याने कारण शाळा व्यवस्थापनाने दिले आहे. कळंबोलीत कारमेल कॉन्व्हेंटमध्ये नर्सरी ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते. शाळेत वेरोनिका नावाने पूर्व प्राथमिक शाळा चालविण्यात येते. नर्सरीला प्रवेश घेतला तरच विद्यार्थ्याला प्राथमिक शाळेत प्रवेश मिळतो. त्यामुळे पालक नर्सरीलाच पाल्यांचा शाळेत प्रवेश घेतात. ठरावीक जागा आणि जास्त अर्ज त्यामुळे कित्येकांना प्रवेश मिळत सुध्दा नाही. नर्सरीकरिता दरवर्षी शुल्क वाढवले जाते आणि तेही एकरकमी भरण्याची सक्ती केली जात असल्याचे पालकांची कुचंबणा होते. आगामी शैक्षणिक वर्षाकरिता शाळा व्यवस्थापनाने नर्सरी, ज्युनिअर आणि सिनीअर केजीच्या शुल्कात वाढ केली आहे. गेल्या वर्षी २३,५00 शुल्क होते त्यामध्ये १0 हजाराने वाढ करीत ती ३३ हजारवर नेण्यात आले आहे. तसे सूचनापत्र विद्यार्थ्यांमार्फत पालकांना पाठविण्यात आले होते. मात्र ही वाढ अन्यायकारक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. गेल्या तीन दिवसांपासून शाळा व्यवस्थापनाबरोबर चर्चा करण्याची मागणी पालक करीत आहेत, मात्र त्याकडेही व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे. (वार्ताहर)कनिष्ठ महाविद्यालय सुरू करायचे आहे, इमारत निधी, शिक्षकांची वेतनवाढ यासाठी ही शुल्कवाढ करण्यात आली आहे. आमची संस्था खासगी असल्याने शासकीय अनुदान नाही त्यामुळे फीवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर पुस्तके, गणवेश बाहेरून घ्या, मात्र इतर फी कमी केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम यांनी याबाबत गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांची संपर्क साधून पालकांसमवेत त्यांची भेट घेतली. यावेळी पालकांनी आपल्या व्यथा साबळे यांच्यासमोर मांडल्या. पूर्वप्राथमिक शाळांवरील शुल्क नियंत्रणासाठी शिक्षण विभागाकडून हालचाली सुरू आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयात संपर्क साधून याबाबत तोडगा काढण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांनी सुध्दा याबाबत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र जर शाळेने फीवाढ मागे घेतली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. ज्युनिअर कॉलेज आणि केजीचा संबंध काय असा सवाल सुध्दा उपस्थित करण्यात आला आहे.