शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईसह पनवेलमधील २९ दहीहंड्या रद्द; पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 23:28 IST

हंड्या रद्द करून त्याद्वारे बचत होणारी रक्कम पूरग्रस्तांना मदतनिधी म्हणून देण्याचा निर्णय संबंधित मंडळांकडून घेण्यात आला आहे.

नवी मुंबई : कोल्हापूर, सांगली येथे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीच्या निमित्ताने नवी मुंबईसह पनवेलमधील २९ हंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या हंड्या रद्द करून त्याद्वारे बचत होणारी रक्कम पूरग्रस्तांना मदतनिधी म्हणून देण्याचा निर्णय संबंधित मंडळांकडून घेण्यात आला आहे. या भूमिकेचे पोलीस आयुक्तांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.पश्चिम महाराष्टÑात आलेल्या पुरामुळे अनेकांवर मोठे संकट कोसळले आहे. या पुरामुळे सांगली, कोल्हापूर येथील अनेक गावांमधील नागरिकांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. तर अनेकांच्या घरांचे पूर्णपणे नुकसान झाले असल्याने त्यांच्यापुढेही आव्हाने निर्माण झाली आहेत. अशावेळी राज्यभरातून त्यांना मदतीचा हात मिळत होता. त्यानुसार नवी मुंबईतील दहीहंडी आयोजक व गणेशोत्सव मंडळांनीही त्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी गत आठवड्यात वाशीत झालेल्या विघ्नहर्ता पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी केले होते. त्यानुसार पनवेल, नवी मुंबईतील नियोजित ९० दहीहंड्यांपैकी २९ हंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात अनेक मानाच्या हंड्यांसह इतरही हंड्यांचा समावेश आहे. त्यापैकी अनेक मंडळांनी हंडी रद्द केल्याने बचत होणारा निधी पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे, तर काहींकडून आवश्यक वस्तू व साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. यामधून नवी मुंबईकरांमधील सामाजिक बांधिलकी व एकोप्याचे दर्शन घडत असल्याची भावना पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार हंड्या रद्द करून खर्चाला आवर घालून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेणाऱ्या मंडळांचे त्यांनी अभिनंदन देखील केले आहे.

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी