शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

महासभेत ४३ नगरसेवकच हजर

By admin | Updated: March 7, 2016 02:45 IST

१७ वर्षासाठीच्या २०२४ कोटी १० लाख रुपये किमतीच्या अर्थसंकल्पास शनिवारी रात्री साडेदहा वाजता मंजुरी दिली. मंजुरी देताना १११ लोकनियुक्त व ५ स्वीकृत सदस्यांपैकी फक्त ४३

नामदेव मोरे,  नवी मुंबईमहासभेने २०१६ - १७ वर्षासाठीच्या २०२४ कोटी १० लाख रुपये किमतीच्या अर्थसंकल्पास शनिवारी रात्री साडेदहा वाजता मंजुरी दिली. वर्षभराच्या जमा - खर्चाच्या नियोजनाला मंजुरी देताना १११ लोकनियुक्त व ५ स्वीकृत सदस्यांपैकी फक्त ४३ नगरसेवकच उपस्थित होते. तब्बल ७८ नगरसेवकांनी दांडी मारली. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी १९७५ कोटी ४० लाख रुपये किमतीचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला होता. दोन दिवस चर्चा झाल्यानंतर स्थायी समितीने त्यामध्ये ११ कोटी ५० लाख रुपयांची वाढ सुचविली. सभापती नेत्रा शिर्के यांनी १९८६ कोटी ९ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेसाठी सादर केला. ४ व ५ मार्चला चर्चेसाठी विशेष महासभेचे आयोजन केले होते. अर्थसंकल्पाच्या जमा - खर्चामध्ये सर्व नगरसेवकांनी त्यांच्या सूचना मांडणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात दोनही दिवस काही नगरसेवक वगळता इतरांनी राजकीय भाषणबाजी करून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करण्यास प्राधान्य दिले. पहिल्याच दिवशी सभा तब्बल दोन तास उशिरा सुरू झाली. दुपारी जेवणाच्या सुटीनंतरही सभा एक तास उशिरा सुरू झाली. दिवसभरामध्ये ११६ पैकी ११ नगरसेवकांनाच बोलण्याची संधी मिळाली. शनिवारीही सभा एक तास उशिरा सुरू झाली. अर्थसंकल्पावर कोणी किती वेळ बोलायचे याविषयी नियोजन केले नसल्याने सुरुवातीला काही सदस्यांनी १ ते ३ तास भाषणे केली. यामुळे पूर्ण दिवसभरामध्ये ४६ जणांनाच बोलता आहे. दोन दिवसामध्ये ५८ जणांनीच सूचना मांडल्या. वास्तविक सभा अजून एक दिवस चालविणे आवश्यक असताना रात्री आठनंतर घाईगडबडीत भाषणे उरकण्यास सुरवात केली. आयुक्त दिनेश वाघमारे व महापौर सुधाकर सोनावणे यांना त्यांची भूमिका मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. साडेदहा वाजता घाईगडबडीत ३६ कोटी ७५ लाख रुपयांची वाढ करून २०२४ कोटी १० लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये विरोधी पक्षातील नगरसेवकांनी त्यांची भाषणे झाली की घरी जाण्यास सुरवात केली. शेवटपर्यंत फक्त नामदेव भगत, मनोज हळदणकर, सुनील बाळाराम पाटील व द्वारकानाथ भोईर एवढेच सदस्य उपस्थित होते. सत्ताधारी राष्ट्रवादीचेही अनेक सदस्य अनुपस्थित होते. सायंकाळी पावणेसहा वाजता सभागृहात फक्त २६ सदस्यच उपस्थित असल्याने कोरमअभावी सभा थांबविण्याची वेळ आली.नगरसेवकांच्या उदासीनतवर प्रेक्षागॅलरीमधील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिवसभर नगरसेवकांच्या भाषणांवर नियंत्रण ठेवले नाही व सायंकाळी नामदेव भगत, शिवसेना गटनेते द्वारकानाथ भोईर, रवींद्र इथापे, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ यांना ५ ते १० मिनिटांमध्ये भाषण उरकण्यास सांगण्यात आले.