शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये ३८,२६३ नोकरदार महिला

By admin | Updated: March 8, 2016 02:13 IST

श्रीमंत तालुका म्हणून रायगड जिल्ह्यात पनवेलचा नावलौकिक आहे. याठिकाणच्या नोकरदार महिलांची संख्या तब्बल ३८, २६३ आहे. मात्र त्या तुलनेत स्थानिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या सोयी- सुविधा मात्र नगण्य आ

पद्मजा जांगडे,  नवी मुंबई श्रीमंत तालुका म्हणून रायगड जिल्ह्यात पनवेलचा नावलौकिक आहे. याठिकाणच्या नोकरदार महिलांची संख्या तब्बल ३८, २६३ आहे. मात्र त्या तुलनेत स्थानिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या सोयी- सुविधा मात्र नगण्य आहे. महिलांची सुरक्षा, पाळणाघर, आरोग्यासाठी विशेष तरतुदी नसल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. कुणी आवड म्हणून, कुणी करिअर म्हणून तर, कुणी गरजेपोटी नोकरी करीत आहेत. पनवेल पालिका क्षेत्रात नोकरदार महिलांची संख्या १६,५५९ इतकी आहे. मात्र नगरपालिकेकडून महिलांच्या सोयी-सुविधांसाठी व सुरक्षेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीच विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. मध्यंतरी रबाळे पोलीस ठाणे व कळंबोली मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू करण्यात आले. मात्र सरकारी अथवा खाजगी आस्थापनांनी पोलिसांच्या या उपक्रमाचा कित्ता गिरवण्याकडे दुर्लक्ष केले. सिडको कार्यक्षेत्रात नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या ११,९६७ इतकी आहे. उच्चभ्रूंची लोकवस्ती असलेल्या खारघर शहरातील ७६१२ तर सिडको नोडअंतर्गत विकसित होत असलेल्या तळोजा पाचनंद येथील ३५४ महिला नोकरी करतात. बहुतांश महिला खासगी क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांना जवळपास दहा ते बारा तास घराबाहेर राहावे लागते. शहरात हजारोंच्या संख्येत असलेल्या पाळणाघरांबाबत स्थानिक प्रशासनाकडे अधिकृत माहिती नसते. मध्यंतरी एका चिमुरड्याला पाळणाघरात होत असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिध्द झाला. प्रशासनने सामाजिक संस्थांच्या मदतीने पाळणाघर सुरू केल्यास, नोकरदार महिलांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.