शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना ३७ हजारांचा दंड

By admin | Updated: September 2, 2015 01:50 IST

पालिकेच्या विविध विभागांची माहिती, माहिती अधिकारांर्गत मागूनही ती मुदतीत न दिल्याने आरटीआय कार्यकर्त्याने केलेल्या अपिलानुसार पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना विभागिय माहिती

राजू काळे , भार्इंदरपालिकेच्या विविध विभागांची माहिती, माहिती अधिकारांर्गत मागूनही ती मुदतीत न दिल्याने आरटीआय कार्यकर्त्याने केलेल्या अपिलानुसार पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना विभागिय माहिती आयुक्तांनी ३७ हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर राज्य माहिती आयोगाने निर्देश देऊनही कारवाई केली नाही म्हणून पालिका आयुक्तांना येत्या १५ दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आरटीआय कार्यकर्ता संतोष कुमार तिवारीने मार्च २०१४ रोजी पालिकेच्या मालमत्ता कर, अग्निशमन, नगररचना, परवाना व घनकचरा विभागाची माहितीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे अर्ज केला होता. मुदतीत माहिती न दिल्याने त्याने राज्य माहिती आयोगाकडे अपिल केले होते. आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी २६ मार्च २०१४ रोजी पालिका आयुक्तांना संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करुन त्याचा अहवाल ३१ मे २०१४ पर्यंत आयोगाकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तत्कालिन आयुक्त सुरेश काकाणी यांनी आस्थापना विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले होते. परंतु, आस्थापना विभागातील काही अधिकाऱ्यांनी कार्यवाहीच्या आदेशाची प्रतच गहाळ केली. परिणामी माहिती देण्यास टाळाटाळ होऊ लागल्याने तिवारी यानी २५ जुलै २०१४ रोजी प्रथम अपिल केल्यानंतर ५ सप्टेंबर २०१४ रोजीच्या सुनावणीत पालिकेच्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी मुदतीत माहिती देण्याचे आदेश संबंधितांना दिले. याबाबत पालिका उपायुक्त (मुख्यालय) यांनी सांगितले की, घटनाक्रमानुसार सध्याच्या आयुक्तांना त्याची कल्पना नाही. सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे-वडे यांना प्रशासनाने अद्यापही जनमाहिती अधिकारीपदाचा कार्यभार सोपविलेला नाही. त्याचा खुलासा कोकण विभागीय माहिती आयुक्तांकडे करण्यात येईल.