शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने ३६ लाखांचा गंडा

By admin | Updated: August 29, 2016 04:27 IST

एव्हिएशन कंपनीच्या माध्यमातून साडेतीन लाखात मुंबई छत्रपती विमानतळावर कायमस्वरूपी नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून एक महिला व तिच्या साथीदारांनी २२ विद्यार्थ्यांना लाखोंचा

पनवेल : एव्हिएशन कंपनीच्या माध्यमातून साडेतीन लाखात मुंबई छत्रपती विमानतळावर कायमस्वरूपी नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून एक महिला व तिच्या साथीदारांनी २२ विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने अश्विनी जगताप या महिलेने अनेक विद्यार्थ्यांना खोटी आश्वासने दिली. बनावट ओळखपत्रे देऊन त्यांची शारीरिक चाचणीही घेतली. खारघर सेक्टर २१ मध्ये राहणाऱ्या गायत्री नाडकर्णी या पाळणाघर चालवितात. पाळणाघराबाबत चौकशी करण्यासाठी अश्विनी आणि त्यांचे सहकारी शरबजीत सिंग कौर आणि मंजीत सिंग पेलिया गेले होते. या वेळी नाडकर्णी यांनी पतीला नोकरीची गरज असल्याचे त्यांना सांगितले. यावेळी तिघांनी आम्ही फ्लायबर्ड एव्हिएशन ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवत असून तीन लाख रुपये भरल्यास कायमस्वरूपी देऊ, अशी हमी दिली. याशिवाय मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जनसंपर्क अधिकारी पदासाठी आॅफरही दिली. त्यांच्या आमिषाला बळी पडून सुरेश नाडकर्णी यांनी अडीच लाख रुपये दिले. या पदासाठी इंग्लिश व फ्रेंच आवश्यक असल्याने नाडकर्णी यांनी सहा महिन्यांचे प्रशिक्षण देखील घेतले. दरम्यान, या तिघांनी आमच्या कंपनीत विविध पदे भरायची असल्याचे सांगितले. नाडकर्णी यांनी आपले मूळ गाव असलेल्या कवठेमहाकाळ गावातील २१ विद्यार्थ्यांचे प्रत्येकी एक ते दोन लाख घेऊन जवळपास ३६ लाख ४९ हजार रु पये धनादेश व रोख रकमेच्या स्वरूपात तिघांकडे टप्प्याटप्प्याने दिले. नोकरीसाठी आवश्यक असलेला तीन महिन्यांचा इंग्लिश स्पिकिंग कोर्सही या विद्यार्थ्यांनी सीवूड येथे पूर्ण केला. इतकेच नव्हे सायन आणि वाशी येथील खाजगी रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करून घेतली. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेरच्या बाजूला प्रशिक्षण देऊन एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाचे ओळखपत्र आणि बीसीए पास देऊन पंधरा दिवसात राहत्या घरी कायमस्वरुपी नियुक्तीचे पत्र मिळेल, असे सांगून विद्यार्थ्यांना आपापल्या गावी पाठवले. मात्र पंधरा दिवस उलटले तरी नियुक्ती पत्र न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी तिघांकडे विचारणा केली असता, त्यांनी टाळाटाळ केली. त्यातील काहींनी विमानतळ प्राधिकरणाकडे चौकशी केली असता, ओळखपत्र आणि पास बनावट असल्याचे समजले. याप्रकरणी नाडकर्णी यांनी मंगळवारी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)