शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीच्या उत्पन्नात ३६ लाख वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:57 IST

बेस्टच्या संपाचा फायदा : आठ दिवसांमध्ये ३ कोटी २४ लाख रुपये महसूल जमा

नवी मुंबई : बेस्टचा संप नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी)च्या पथ्यावर पडला आहे. आठ दिवसांमध्ये ३ कोटी २४ लाख रुपयांचा महसूल तिकीटविक्रीतून प्राप्त झाला असून, सरासरीपेक्षा तब्बल ३६ लाख रुपये जादा उत्पन्न प्राप्त झाले आहे.

मुंबईसह नवी मुंबईमध्येही बेस्ट बसेसचे प्रमाण जास्त आहे. संपामुळे या परिसरातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ लागली होती. रेल्वे, रिक्षा व टॅक्सीबरोबर एनएमएमटी बसनेही संपाच्या काळात प्रवाशांना आधार दिला. एनएमएमटीच्या मुंबईमध्ये १४ मार्गावर ११४ बसेस सुरू असून, रोज १२५ फेऱ्या होत असतात. संप काळात या मार्गावर ४० बसेस वाढविण्यात आल्या होत्या. नवी मुंबई, पनवेलमधील उपक्रमाच्या बसेसही वेळेत धावतील याची काळजी घेतली जात होती. याचा फायदा उपक्रमाला झाला आहे. प्रतिदिन तिकीटविक्रीतून सरासरी ३६ लाख रुपये उत्पन्न होत होते. संप काळात शनिवार व रविवारच्या दोन दिवसांच्या सुट्टीचा अपवाद वगळता रोज ४१ लाख पेक्षा जास्त महसूल प्राप्त झाला आहे. १४ जानेवारीला सर्वाधिक ४३ लाख ५८ हजार रुपये महसूल प्राप्त झाला आहे. एक आठवड्यामध्ये सर्वप्रथमच ३ कोटी २४ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

एनएमएमटी प्रशासनाने बेस्टच्या संप काळात प्रवाशांचे हित लक्षात घेऊन आवश्यक त्या मार्गावर बससेवा वाढविण्यात आली होती. यामध्ये उत्पन्न वाढविण्यापेक्षा प्रवाशांची गैरसोय दूर करणे हा प्रमुख हेतू असल्याची प्रतिक्रिया प्रशासनाने दिली आहे.कर्मचाºयांनीही या काळात चांगले काम केल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. 

नवी मुंबईसह मुंबईमधील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सर्वांनी चांगले सहकार्य केल्यामुळे उपक्रमाला या आठ दिवसांमध्ये ३६ लाखांपेक्षा जास्त महसूल प्राप्त झाला आहे.- विसाजी लोके, परिवहन सदस्य, शिवसेनाबेस्ट संपाच्या काळात मुंबईमधील व घणसोली ते वाशी दरम्यान बसफेºया वाढविल्या होत्या. या काळात सरासरी ४१० बसेस रोडवर धावत होत्या. यामुळे रोजच्या उत्पन्नामध्ये सरासरी पाच लाख रुपयांची वाढ झाली आहे.- शिरीष आरदवाड,परिवहन व्यवस्थापक,एनएमएमटी

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका