शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

गोवा महामार्गावर ३० सीसीटीव्ही कॅमेरे

By admin | Updated: September 1, 2016 03:25 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या टप्प्यातील खड्डे बुजवून महामार्ग बिनधोक करण्यात अद्याप यश आले

जयंत धुळप, अलिबागराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या टप्प्यातील खड्डे बुजवून महामार्ग बिनधोक करण्यात अद्याप यश आले नसले तरी रायगड पोलीस दलाने या गोष्टीचा बाऊ न करता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाही याकरिता कंबर कसून वाहतूक नियोजन केले आहे. गोवा महामार्गावर पेण ते पोलादपूर दरम्यान एकूण ३० सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले असून, त्या माध्यमातून वाहतुकीचे नियंत्रण करण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी दिली आहे.गोवा राष्ट्रीय महामार्गावर पहिल्या टप्प्यात, पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हमरापूर फाटा पोलीस मदत केंद्र येथे दोन, पेण-खोपोली बायपास येथे तीन, अंतोरा फाटा येथे दोन आणि रामवाडी पोलीस चौकी येथे दोन अशा या पाच ठिकाणी एकूण नऊ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हमरापूर-रामवाडी या टप्प्यातील वाहतूक या ९ कॅमेऱ्यांमुळे पेण पोलिसांच्या दृष्टिक्षेपात राहू शकणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नागोठणे पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात वाकण पोलीस मदत केंद्राच्या अंतर्गत तीन कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. वडखळ ते नागोठणे-वाकण या टप्प्यातील वाहतूक नियंत्रण या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.तिसऱ्या टप्प्यात माणगाव पोलीस ठाण्यांतर्गत,इंदापूर एसटी स्टॅन्ड येथे तीन, माणगाव एसटी स्टॅन्ड येथे तीन आणि मोर्बा नाका येथे तीन अशा नऊ कॅमेऱ्यांच्या माध्यमातून इंदापूर ते मोर्बा नाका या टप्प्यातील वाहतुकीवर नजर ठेवता येणार आहे. चौथ्या टप्प्यात गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत लोणेरे पोलीस चौकी येथे तीन कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. तर पाचव्या टप्प्यात महाड शहर पोलीस ठाण्यांतर्गत नातेखिंड मदत केंद्र येथे दोन आणि विसावा हॉटेल नाका येथे दोन असे चार कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत.माणगांव येथे लोखंडी बॅरिकेट्स लावून खरेदीकरिता कोणत्याही वाहनास थांबू दिले जाणार नसल्याचे हक यांनी स्पष्ट केले आहे. अखेरच्या सहाव्या टप्प्यात पोलादपूर पोलीस ठाण्यांतर्गत पोलादपूर शहरातील शिवाजी पुतळ््याजवळ दोन कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. महाडकडून रत्नागिरी, महाडकडून महाबळेश्वर या दोन्ही मार्गावरील ये-जा करणाऱ्या वाहनांवर या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवता येणार आहे.बेदरकारपणे वाहन चालविणे, विनाकारण आणि धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे अशा घटना घडू नयेत याकरिता या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बारकाईने चोवीस तास निरीक्षण करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा अनुचित प्रकार दिसून आल्यास तत्काळ सीसीटीव्ही निरीक्षण कक्षातून महामार्गावर तैनात वाहतूक पोलीस जीप व रायडर्स यांना वायलेसवरुन सूचना देण्यात येईल. प्रत्यक्ष घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात येईल असे नियोजन करण्यात आले आहे. दुर्दैवाने एखादे वाहन रस्त्यात बंद पडले तर ते तेथून खेचून बाजूला घेवून जाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.