शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

लॉकडाऊनच्या काळात 29 लाख नागरिकांची एपीएमसीत चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 02:36 IST

प्रतिदिन ८०० नागरिकांची कोरोना टेस्ट : प्रत्येकाच्या प्राथमिक तपासणीवर भर

ठळक मुद्देबाजार समिती प्रशासनाने पुरेशी काळजी घेतल्यानंतरही अनेक व्यापारी, कामगार व ग्राहक मास्क वापरत नाहीत, साेशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना पसरण्याचा सर्वाधिक धोका असल्यामुळे प्रशासनाने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.  लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत मार्केटमध्ये २९ लाख ३७ हजार ६७७ नागरिकांची ऑक्सिजन पातळी व तापमानाची तपासणी करण्यात आली आहे. प्रतिदिन १७ ते २० हजार नागरिकांची प्राथमिक तपासणी होत असून ७०० ते ८०० जणांची कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोना काळात मुंबई, नवी मुंबईमधील जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी बाजार समितीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

पाचही मार्केट सुरू ठेवल्यामुळे दीड कोटी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वेळेवर पोहोचविता आल्या. बाजार समितीमुळे नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा आक्षेप घेण्यात आल्यामुळे मार्केट बंद करण्यासाठी दबाव येऊ लागला होता. प्रशासनाने प्रत्येक मार्केटमध्ये कोरोना नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली. मार्केटमध्ये येणाऱ्या वाहनांच्या संख्येवरही नियंत्रण ठेवण्यात आले. मार्केटमध्ये येणाऱ्या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यावर भर देण्यात आला. प्रवेशद्वारावर तपासणी केंद्र सुरू केले असून . प्रत्येक दिवशी १७ ते २० हजार नागरिकांचे तापमान तपासले जात आहे. ज्यांचे तापमान व ऑक्सिजन पातळी योग्य नाही त्यांची तत्काळ कोरोना चाचणी करण्याची सुविधा मार्केटमध्ये उपलब्ध केली आहे. याशिवाय स्वेच्छेेने ज्यांना तपासणी करायची आहे त्यांनाही चाचणीची सुविधा  दिली आहे.  

बाजार समिती प्रशासनाने पुरेशी काळजी घेतल्यानंतरही अनेक व्यापारी, कामगार व ग्राहक मास्क वापरत नाहीत, साेशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक तयार केले आहे. या पथकाकडून नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. प्रवेशद्वारावर सॅनेटायझरही उपलब्ध करून दिले आहे. 

बाजार समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची तापमान व ऑक्सिजन पातळी तपासली जात आहे. प्रत्येक मार्केटमध्ये कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध केली आहे. नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती केली असून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.     - अशोक डक,     सभापती, मुंबई बाजार समिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या