शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रोह्यात चार तासांत २६.१६ टक्के

By admin | Updated: February 22, 2017 06:52 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या चार व तालुका पंचायत समितीच्या आठ जागांसाठी मंगळवारी सकाळी

रोहा : रायगड जिल्हा परिषदेच्या चार व तालुका पंचायत समितीच्या आठ जागांसाठी मंगळवारी सकाळी ११.३०पर्यंत चार तासांत २६.१६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नागोठणे गटात सर्वाधिक २९.८९ टक्के तर खारगाव गटात सर्वात कमी २४.९१ टक्के मतदान झाले होते.मंगळवारी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. रोहा शहरालगतच्या गावांपेक्षा विशेषत: ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह अधिक होता. यात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. मतदार यादीत नाव नसल्याने मतदानाचा हक्क न मिळाल्याच्या तुरळक घटना वगळता मतदान प्रक्रि या पूर्णपणे शांततेत चालू होती. सकाळी साडेअकरापर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार जिल्हा परिषद गटांमध्ये नागोठणे २९.८९, आंबेवाडी २५.४६, वरसे २४.९६ तर खारगाव २४.९१ टक्के मतदान झाले होते. तर पंचायत समिती गणांमध्ये नागोठणेत २९.७६, ऐनघर ३०.०२, खांब सर्वात कमी २१.३२, आंबेवाडी सर्वाधिक ३०.६८, धाटाव २५.९८, वरसे २३.९०, खारगाव २४.१९ तर विरझोली २५.६२ टक्के इतके मतदान झाले होते. (वार्ताहर)धाटावमध्ये सरासरी ७४ टक्के मतदानच्धाटाव : रोह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण चार जागांकरिता १२ तर पंचायत समितीच्या ८ जागांसाठी २४ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. रोहा तालुक्यात गटनिहाय मतदारांची संख्या २१ जानेवारी रोजीच्या अंतिम मतदार यादीप्रमाणे १ लाख १५ हजार ८१२ मतदार आहेत. यामध्ये एकूण पुरु ष मतदार ६० हजार ८० असून महिला मतदार ५५ हजार ७३२ एवढी असल्याने कोण किती मताधिक्य घेणार हे मतमोजणीदरम्यान स्पष्ट होणार आहे. मंगळवारी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून आले. धाटावमध्ये सरासरी ७४ टक्के मतदान झाले. रोह्यात निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आल्याने प्रांताधिकारी रवींद्र बोंबले,तहसीलदार सुरेश काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील एकूणच १५९ मतदान केंद्रावरील अधिकारी वर्गाची नेमणूक व साहित्य वाटप करण्यात आले होते. पोलीस कर्मचारीवर्गाकडून सुद्धा बंदोबस्त चोखपणे ठेवण्यात आला होता. धाटावमध्ये सरासरी ७४ टक्के मतदान झाले.यापैकी एकूण चार मतदान केंद्रावरील मतदानापैकी मतदान केंद्र १ वर ११९१ पैकी ९३६, मतदान केंद्र २ वर ८०० पैकी ६३२, मतदान केंद ३ वर ३५४ पैकी २५१ तर, मतदान केंद्र ४ वर ७३१ पैकी ४३० मतदान झाले.