शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

लोकायुक्तांकडे २५६ कु टुंबांची तक्रार

By admin | Updated: August 30, 2016 03:06 IST

सन १९७० च्या अधिसूचनेने न्हावा शेवा बंदर प्रकल्पासाठी संपादित केली तेव्हापासून लोकसेवकांकडून आम्हास विनाकारण त्रास देण्यात येत आहे.

जयंत धुळप,  अलिबागसन १९७० च्या अधिसूचनेने न्हावा शेवा बंदर प्रकल्पासाठी संपादित केली तेव्हापासून लोकसेवकांकडून आम्हास विनाकारण त्रास देण्यात येत आहे. तो थांबविण्यात यावा या प्रमुख मागणीकरिता उरणमधील हनुमान कोळीवाडा परिसरातील त्रस्त २५६ कुटुंबांच्या वतीने मनोहर काशिनाथ कोळी यांनी तब्बल ३९ पुराव्यांच्या दस्तावेजांसह लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. त्याची सुनावणी लवकरच होईल, अशी माहिती मनोहर कोळी यांनी दिली आहे.तक्रारीमध्ये नमूद लोकसेवकांमध्ये पनवेल उपविभागीय अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी, कोकण विभागीय महसूल आयुक्त, न्हावा शेवा बंदर प्रकल्प पुनर्वसन समिती अध्यक्ष, प्रधान सचिव महसूल व वनविभाग (पुनर्वसन), प्रधान सचिव नगर विकास विभाग (१), मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य या सहा जणांचा समावेश आहे.रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील शेवाकोळीवाडा गावचे अनादी काळापासून आम्ही मूळचे रहिवासी आहोत. त्या गावात चरितार्थासाठी पिढ्यान्पिढ्या चालत आलेली हक्काची साधन संपदा होती. ती साधन संपदा (गावठाण वगळून) या लोकसेवकांनी सन १९७० च्या अधिसूचनेने न्हावा शेवा बंदर प्रकल्पासाठी संपादित केली आहे. त्यानंतर न्हावा शेवा बंदर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कारणासाठी शेवाकोळीवाडा गावठाण कोकण विभागीय महसूल आयुक्तांच्या सन १९८४ च्या अधिसूचनेने संपादित केली आहे.पनवेल उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेवा कोळीवाडा गावाला ५१ हेक्टर मंजूर जमिनीपैकी १२ हेक्टर जमिनीत सन १९८३ ला स्थलांतर करुन घेतल्यानंतर १७ मार्च १९९० व १७ फेब्रुवारी १९९० रोजी महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट) नियम १९७१ च्या रुल ३० अन्वये ७.१२ हेक्टर मूळ गावठाणाच्या बदल्यात नवीन गावठाणात २१.९० हेक्टर (नवीन शेवा गावाला मौ.बोकडवीरा येथील १५.७५ हेक्टर व हनुमानकोळीवाडा गावाला मौ.बोरीपाखाली येथील ६.१५ हेक्टर ) जमीन विकसित देखील करुन दिलेली आहे,अशी बनावट आज्ञापत्रे केलेली आहेत,असे या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी जिल्हा प्रशासन व शासनाकडून भूमिका मांडली जाईल. सध्या हे प्रकरण अलिबाग उप विभागीय महसूल अधिकारी व प्रभारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सर्जेराव सोनवणे यांच्याकडे असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागाचे तहसीलदार मिलिंद गांगुर्डे यांनी दिली आहे.