शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांमुळे २५० कोटी बुडणार?

By admin | Updated: March 10, 2016 02:09 IST

आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना हाती असल्याने पालिकेच्या एलबीटी विभागाने करवसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे

उल्हासनगर : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना हाती असल्याने पालिकेच्या एलबीटी विभागाने करवसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. पण त्याविरोधात व्यापारी आक्रमक झाले असून त्यांच्या इच्छेविरोधात करवसुली केल्यास आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते ओमी कालानी यांनी दिला आहे. पालिकेचा एलबीटी विभाग करवसुलीसाठी जिद्दीला पेटल्याने या मुद्द्यावरून शहरात भडका उडण्याची चिन्हे आहेत. जवळपास ९५ टक्के व्यापाऱ्यांनी कर भरलेला नाही. तो वसूल न केल्यास पालिकेला सुमारे २५० कोटींवर पाणी सोडावे लागण्याची चिन्हे आहेत.मानधनावर घेतलेल्या पाच सल्लागारांनी गेल्या आठ महिन्यात १५,६०० पैकी ५४३ व्यापाऱ्यांकडून करवसुली केली आहे. त्यातून पालिकेला २ कोटी ८९ लाख रूपयाचे उत्पन्न मिळाले. एलबीटी बंद झाल्यानंतरच्या पाच वर्षात एलबीटी वसूल होऊ शकते आणि ती भरणे बंधनकारक असल्याने व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे. एलबीटी विभागाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सल्लागारांची संख्या वाढविण्याची विनंती पालिका आयुक्तांकडे केली आहे. ही संख्या वाढल्यास १५ हजार व्यापाऱ्यांच्या कराची वसुली सहा महिन्यांत होईल. मात्र पालिका निवडणुका डोळयासमोर ठेवून काही राजकीय नेते व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभी ठाकले आहेत. व्यापारी संघटनेचे नेते बच्चो रूपचंदानी, नरेश दुर्गानी यांच्यासह इतरांनी नियमानुसार कर भरणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. मात्र काही नेते व्यापाऱ्यांची दिशाभूल करीत असल्याची माहिती लेंगरेकर यांनी दिली आहे.