शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन जवानांना २० लाखांचा अपघात विमा

By admin | Updated: May 16, 2017 00:56 IST

अग्निशमन दलातील जवानांना सिडकोने वीस लाख रुपयांचा अपघात विमा देवू केला आहे. इतकेच नव्हे, तर कर्तव्यपूर्ती करताना मृत पावलेल्या सिडकोच्या अग्निशमन दलातील

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अग्निशमन दलातील जवानांना सिडकोने वीस लाख रुपयांचा अपघात विमा देवू केला आहे. इतकेच नव्हे, तर कर्तव्यपूर्ती करताना मृत पावलेल्या सिडकोच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना शहिदाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महामंडळाने घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत हे दोन निर्णय घेण्यात आले आहेत. सिडकोचे द्रोणागिरी, खारघर, नवीन पनवेल आणि कळंबोली हे चार अग्निशमन केंद्रे आहेत, तर उलवे येथे नव्यानेच केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या पाचही केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सिडकोच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी स्वत:च्या प्राणांची बाजी लावून आपत्कालीन परिस्थितीत लोकांच्या प्राणांचे व संपत्तीचे रक्षण करतात. यात अनेकदा या जवानांना आपला जीव गमवावा लागतो. जीवाची बाजी लावून जीवित व संपत्तीचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन जवानांना शहिदाचा दर्जा देण्याचा ठराव महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाने मंजूर केला आहे. नगर विकास विभागाच्या या ठरावाच्या अधीन राहून सिडको महामंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला सिडको मदतीचा हात देणार आहे. अग्निशमन दलातील वीरमरण प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शहिदाचा दर्जा देणारे सिडको हे देशातील पहिले महामंडळ ठरले आहे. देशातील प्रत्येक अग्निशमन कर्मचारी अपघात विमा धोरणांतर्गत सुरक्षित असायला हवा. अग्निशमन विभागाचे काम पाहता कोणत्याही क्षणी कठीण प्रसंग ओढावू शकतो. गंभीर जखमी किंवा जीवित हानी होवू शकते. जखमी अवस्थेत संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी व त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत, या हेतूने सिडकोने आपल्या अग्निशमन केंद्रातील प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी २0 लाखांपर्यंतच्या अपघात विम्याचे प्रयोजन केले आहे.