शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकाकडून १८ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:45 IST

सिडकोच्या मंजूर प्लॅनपेक्षा वेगळा असा खोटा व बनावट नकाशा तयार करून बांधकाम व्यावसायिकाने एका ग्राहकाची १८ लाखांची फसवणूक केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे.

पनवेल : सिडकोच्या मंजूर प्लॅनपेक्षा वेगळा असा खोटा व बनावट नकाशा तयार करून बांधकाम व्यावसायिकाने एका ग्राहकाची १८ लाखांची फसवणूक केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे.खारघर कोपरा येथील सेक्टर १० मध्ये राहणारे शिवराम प्रभाकर सुतार (३१) यांनी येथील एकता कन्स्ट्रक्शन या सय्यद एजाज सुलतान व मोहम्मद मुर्तझा अशान यांच्याकडे रूम घेण्यासाठी पैसे गुंतवले होते. २०१२ मध्ये त्यांनी १८ लाख २० हजार रुपये रोख रक्कम व बँकेतील लोन मंजूर करून बांधकाम व्यावसायिकाला दिले होते. बांधकाम व्यावसायिकाने सह दुय्यम निबंधक कार्यालय पनवेल येथे त्यांना रूमचा दस्त नोंदणीकृत करून दिला आहे. या वेळी बांधकाम व्यावसायिकाने सिडकोच्या मंजूर प्लॅनपेक्षा वेगळा बनावट नकाशा त्यांना दाखवला. विकासक एजाज सुलतान व मोहम्मद मुर्तझा यांनी रूमचे भोगवटाप्रमाणपत्र लवकरच भेटेल व लगेच सदर रूमचा ताबा मिळेल, असेही सुतार यांना सांगितले होते. मात्र, बिल्डिंगचे काम पूर्ण झाले तरी ताबा न दिल्याने सुतार यांनी एकता कन्स्ट्रक्शनचे भागीदार सय्यद एजाज सुलतान व मोहम्मद मुर्तझा अशान यांना २०१४ मध्ये वकिलांमार्फत नोटीस दिली होती. सुतार यांनी सिडको कार्यालयामध्ये इमारतीबद्दल चौकशी केली असता सिडकोने सदर बांधकामास भोगवटा प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याचे समजले. त्यामुळे रूम ताब्यात देण्याबाबत बिल्डरकडे त्यांनी तगादा लावला असता बांधकाम व्यावसायिकांनी शिवीगाळ करून त्यांना चेक बाउंसच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जुलै २०१९ मध्ये सुतार यांनी खारघर पोलीस ठाण्यात सय्यद एजाज सुलतान व मोहम्मद अशान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.