शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

घणसोली गावातील मंदिरात १६८ तास अखंड हरिनाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 23:18 IST

११७ वर्षांची परंपरा । ग्रामस्थांनी निर्माण केला ऐक्याचा आदर्श

नवी मुंबई : स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या घणसोलीमधील ग्रामस्थांनी दहीहंडी उत्सवाची ११७ वर्षांची परंपरा जपली आहे. हनुमान मंदिरामध्ये सलग १६८ तास भजन सादर करण्यात आले. ग्रामस्थांनी जुनी परंपरा जपून सर्वांसमोर ऐक्याचा नवीन आदर्श घालून दिला आहे.

स्वातंत्र्य लढ्यामध्ये घणसोलीमधील स्वातंत्र्यसैनिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या परिसरात सरोजिनी नायडू, दत्ताजी ताम्हणे व इतर अनेक स्वातंत्र्यसेनानींनी हजेरी लावली होती. नवी मुंबई महापालिकेची निर्मिती झाल्यानंतरही ग्रामस्थांनी गावातील जुन्या परंपरा व उत्सव सुरूच ठेवले असून त्यामध्ये गोकुळ अष्टमी महोत्सवाचाही समावेश आहे. १६ आॅगस्टला गावातील हनुमान मंदिरामध्ये अखंड हरिनामाला सुरुवात झाली. सलग १६८ तास मंदिरामध्ये भजन करण्यात आले.

गावातील कौलआळी, कोळीआळी, म्हात्रेआळी, चिंचआळी, नवघरआळी, पाटीलआळी या सहा प्रमुख आळीमधील नागरिक नियोजन करून २४ तास भजन म्हणत असतात. शुक्रवारी मध्यरात्री हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. पाटीलआळीच्या महिला भजनमंडळाने मंदिरामध्ये श्रीकृष्णजन्माचे पाळणागीत सादर केले. शानिवारी मानाची हंडी म्हात्रेआळीच्या मनीष म्हात्रे यांनी फोडली. गावामध्ये उंच दहीहंडी उभारण्यात येत नाही. १५ फुटांपर्यंतच हंडी उभारली जाते.

टाळ, मृदुंगाच्या गजरात सलग सात दिवस २४ तास भजन सादर करण्याची परंपरा देशात फक्त घणसोलीमध्ये सुरू आहे. ११७ वर्षे अखंडपणे ही परंपरा सुरू ठेवण्यात आली असून हा एक विक्रम समजला जात असुन ग्रामस्थांनी ऐक्याचा आदर्श कायम ठेवला आहे.घरामध्ये सुरू झाला उत्सवघणसोलीमधील शिनवार कमळ्या पाटील यांच्या घरामध्ये १९०२ मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली. १९०६ पर्यंत त्यांच्याच घरात हा उत्सव सुरू होता. त्यानंतर ग्रामस्थांनी गावच्या मंदिरात तो उत्सव सुरू करून ती परंपरा कायम ठेवली आहे. शिनवार पाटील यांच्या चौथ्या पिढीतील भानुदास पाटील यांची मानाची दहीहंडी यावर्षी म्हात्रेआळी बाळगोपाळांनी फोडली.