शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

कळंबोलीत वाहतूक पोलिसांकडून १६ हजार अवजड वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:23 IST

३९ लाखांहून अधिक दंड वसूल

- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : पनवेल परिसरात अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. तसेच ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पार्किंग केली जाते. त्याचा त्रास स्थानिकांना होत असून, वाहतूककोंडीचीही समस्या उद्भवत आहे. याशिवाय खासगी बसचालकांकडूनही वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. गेल्या दहा महिन्यांत कळंबोली वाहतूक शाखेने नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनांवर धडक मोहीम हाती घेतली. त्यांनी १६ हजारांपेक्षा जास्त अवजड वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामध्ये २३०० पेक्षा जास्त खासगी बसचा समावेश आहे. यांच्याकडून जवळपास ३० लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे आता कळंबोली परिसरातील अनेक रस्ते मोकळे दिसू लागले आहेत.

कळंबोली येथे सर्वात मोठी स्टील मार्केट आहे. मार्केटमधून लोखंड आणि पोलाद ने-आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अजवड वाहने देशभरातून या ठिकाणी येतात. येथूनच २५ किलोमीटर अंतरावर जेएनपीटी आहे. त्या ठिकाणी दिवसभरात हजारो वाहनांची वर्दळ असून कळंबोली परिसरात ही वाहने मिळेल त्या जागी उभी केली जातात.

खरतर कळंबोलीमध्ये अवजड वाहनांना प्रवेश करण्यास मनाई आहे. तरीसुद्धा हाईट गेज तोडून ट्रक, ट्रेलर, टँकर अंतर्गत रस्त्यावर उभी केलेली दिसतात, तसेच मोकळ्या भूखंडावर वसुलीदादा अनधिकृत पार्किंग करत आहेत. मध्यंतर या विरोधात स्थानिक रहिवाशांनी आवाज उठवला होता. एकता सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत यांनी अनेक वर्षांपासून याबाबत पाठपुरावा केला आहे.

कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांनी कठोर भूमिका घेत, बेकादेशीर पार्क केलेल्या, नियमांची पायमल्ली करणाºया अवजड वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यानुसार गेल्या ११ महिन्यांत १६ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून जवळपास ३९ लाख ३३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कारवाई करण्यात आलेल्या खासगी बसची संख्याही मोठी आहे. या मालकांकडून आणि चालकांकडून जवळपास पावणेसात लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कळंबोली वाहतूक पोलिसांच्या मोहिमेमुळे परिसरातील अनेक रस्ते अवजड वाहनमुक्त झाले आहे. अंतर्गत रस्त्यांबरोबरच राष्ट्रीय महामार्गालगत उभ्या असलेल्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे.

कळंबोली वाहतूक शाखेच्या वतीने मार्च २०१९ पासून १६,१४२ इतक्या अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई अशीच सुरू ठेवणार आहे. वाहतुकीचे नियम मोडणाºया वाहनचालकांची गय केली जाणार आहे.- अंकुश खेडकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कळंबोली वाहतूक शाखा

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTrafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक