वाशी सेक्टर ८ मध्ये राहणाऱ्या व्यवसायीकाच्या घरात दाेन वर्षामध्ये नोकरांनीच १६ लाख रूपयांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.व्यवसायीक मोहीत खन्ना यांच्या घरामध्ये ही चोरी झाली आहे. मे २०२१ ते ऑगस्ट २०२२ दरम्यान त्यांच्या घरामधून ९ लाख रुपये रोखड, ५० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे कडे, २ लाख रुपये किमतीची सोनसाखळी, ३ लाख रुपये किमतीचा हिरा व ५० हजार रुपये किमतीची हिरेजडीत अंगठी असा एकूण १६ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. ही चोरी घरामध्ये काम करणाऱ्या नोकरांनीच केली असल्याचा आरोप मोहीत यांनी केला असून याविषयी वाशी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी मुळ उत्तराखंडमधील रहिवासी असलेला कैलाश व बिहारमधील रहिवासी असलेला प्रमोद व सुनिल या तीघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
नोकरांनीच मारला १६ लाखांवर डल्ला
By नामदेव मोरे | Updated: September 18, 2022 14:22 IST