शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

१६ माजी नगरसेवक पराभूत

By admin | Updated: May 27, 2017 01:48 IST

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत ७८ पैकी ५१ जागांवर भाजपाने विजय संपादित केला असून, शेकाप आघाडीला केवळ २७ जागांवर समाधान मानावे लागले आहे

मयूर तांबडे  लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत ७८ पैकी ५१ जागांवर भाजपाने विजय संपादित केला असून, शेकाप आघाडीला केवळ २७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत अनेक आजी-माजी नगरसेवक निवडणूक लढवत होते, त्यांनादेखील पराभवाचा धक्का बसला आहे.पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत २८ आजी-माजी नगरसेवक निवडणूक लढवत होते. यापैकी काँग्रेसच्या निर्मला म्हात्रे, लतीफ शेख, भाजपाचे नितीन पाटील, संगीता कांडपाळ, शेकापचे राजेश हातमोडे, संदीप पाटील, सुनील बहिरा, श्वेता बहिरा, अजय कांडपिळे, मुकुंद म्हात्रे, शिवाजी थोरवे, शिवसेनेचे रमेश गुडेकर, अच्युत मनोरे, प्रमिला कुरघोडे, राष्ट्रवादीचे अजय भोईर, शशिकला सिंग या माजी नगरसेवकांचा या पनवेल महापलिकेच्या निवडणुकीत पराभव झाला. तर भाजपाचे मनोहर म्हात्रे, हेमलता म्हात्रे, समीर ठाकूर, संतोष शेट्टी, चारुशीला घरत, दर्शना भोईर, राजू सोनी, एकनाथ गायकवाड, सीता पाटील, प्रकाश बिनेदार व शेकापचे प्रीतम म्हात्रे, सुरेखा मोहोकर या माजी नगरसेवकांचा विजय झाला. माजी नगरसेवकांत प्रीतम म्हात्रे व नितीन पाटील, संतोष शेट्टी व शशिकला सिंग, श्वेता बहिरा व चारु शीला घरत, राजेश हातमोडे व समीर ठाकूर यांच्यात एकमेकांविरोधात लढत झाली. यात प्रीतम म्हात्रे, संतोष शेट्टी, चारुशीला घरत, समीर ठाकूर हे विजयी झाले. तर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकला शेळके, हरिष केणी, प्रज्योती म्हात्रे, गोपाळ भगत, अरविंद म्हात्रे यांनीदेखील विजय संपादित केला आहे.शेकापचे अजीज पटेल यांनी भाजपाच्या विनोद घरत यांच्यावर प्रभाग-३मध्ये केवळ १ मताने विजय प्राप्त केला आहे. तर भाजपाचे परेश ठाकूर यांनी ११ हजारहून अधिक मते घेत, शेकापच्या बाळाराम पाटील यांच्यावर ७ हजार ५०० मतांनी विजय मिळविला. शेकापचे संदीप पाटील हे पाचव्यांदा निवडणूक लढवत होते. चार वेळा ते विजयी झाले होते. मात्र, भाजपाच्या मनोज भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला.