शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
3
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
4
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
5
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
6
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
7
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
8
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
9
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
10
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
11
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
12
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
13
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
14
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
15
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
16
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
17
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
18
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
19
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
20
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का

१५ कि.मी. अंतर केले दोन तासांत पार

By admin | Updated: January 18, 2016 02:20 IST

वाशी येथे राहणाऱ्या वेदांत विश्वनाथ सावंत (९) या विद्यार्थ्याने रविवारी सकाळी घारापुरी ते गेटवे आॅफ इंडिया हे १५ कि.मी.चे अंतर पोहून अवघ्या २ तास ५० मिनिटे

नवी मुंबई : वाशी येथे राहणाऱ्या वेदांत विश्वनाथ सावंत (९) या विद्यार्थ्याने रविवारी सकाळी घारापुरी ते गेटवे आॅफ इंडिया हे १५ कि.मी.चे अंतर पोहून अवघ्या २ तास ५० मिनिटे २८ सेकंदात पूर्ण केले. नवी मुंबईतील चिमुरड्याचा हा सागरी प्रवास पाहण्यासाठी तसेच त्याला प्रोत्साहन देण्यासाठी गेटवे आॅफ इंडिया येथे अनेक जलतरणपटू तसेच नागरिकांनी गर्दी केली होती. वाशीतील फादर अ‍ॅग्नेल शाळेत शिकणाऱ्या वेदांतला अभ्यासाबरोबरच जलतरणाची आवड आहे. नियमित सराव, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि पालकांच्या प्रोत्साहनाने हे अंतर यशस्वीपणे पार करता आल्याचे तो सांगतो. महाराष्ट्र जलतरण संघटनेच्या मान्यतेने आणि ओपन वॉटर सी स्वीमिंग क्लब आॅफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईतील क्रीडापटूंना सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सुधाकर सोनवणे यांनीही या स्थळी भेट देऊन वेदांतचे कौतुक करून अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही नावलौकिक मिळवावा, असा सल्ला दिला. संपूर्ण प्रवासात न डगमगता वेदांतने आत्मविश्वासाने हे अंतर पार केले. संतोष पाटील (आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक), तसेच संकेत सावंत(ए.एस.सी.ए. प्रशिक्षक) यांचे उत्तम प्रशिक्षण व कुशल मार्गदर्शनाखाली हा वेदांतने हा प्रवास उत्कृष्टरीत्या पार केल्या माहिती वेदांतच्या पालकांनी दिली. यावेळी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दशरथ भगत, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेवक राजू शिंदे आदी मान्यवर मंडळी तसेच क्रीडाप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)