शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

पोलीस भरतीसाठी १२,२०० उमेदवारी अर्ज

By admin | Updated: February 21, 2016 02:35 IST

पोलीस आयुक्तालयातील ७८ व कारागृहाच्या १२ जागांसाठी शनिवार दुपारपर्यंत १२,२०० अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र आॅनलाइन अर्ज सादर करण्याच्या मुदतीला १५ दिवसांची वाढ मिळाल्याने

नवी मुंबई : पोलीस आयुक्तालयातील ७८ व कारागृहाच्या १२ जागांसाठी शनिवार दुपारपर्यंत १२,२०० अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र आॅनलाइन अर्ज सादर करण्याच्या मुदतीला १५ दिवसांची वाढ मिळाल्याने त्यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदासाठी ७८ व कारागृह शिपाई पदासाठी १२ अशा एकूण ९० जागांसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात भरती प्रक्रिया होत आहे. राज्यातील इतर पोलीस आयुक्तालयांसह नवी मुंबई आयुक्तालयात रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे. इच्छुक उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी १८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र इच्छुक उमेदवारांचा वाढता प्रतिसाद पाहता अधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी अंतिम मुदत १५ दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्यानुसार ४ मार्चपर्यंत इच्छुकांना पोलीस भरतीसाठी आॅनलाइन अर्ज करता येणार आहेत. दरम्यान नवी मुंबई आयुक्तालयामार्फत ९० जागांसाठी होणाऱ्या भरतीसाठी शनिवार सकाळपर्यंत १२,२०० अर्ज प्राप्त झाल्याचे प्रशासन उपायुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. तर मुदत वाढल्याने अर्जांच्या संख्येत अधिक वाढ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यंदा तोंडी परीक्षा होणार नसून केवळ मैदाणी आणि लेखी परीक्षाच उमेदवारांना द्यावी लागणार आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांची शारीरिक चाचणी कळंबोलीच्या पोलीस मुख्यालय मैदानावर होणार आहे. पुरुषांसाठी १,६०० मीटर व महिलांसाठी ८०० मीटर धावण्याची चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी खारघरच्या सेंट्रल पार्कलगतच्या रस्त्यावर होणार असल्याचेही उपायुक्त खैरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)