शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

एक हजार जागांसाठी १२ हजार अर्ज, भरतीसाठी राज्यातील तरुण पनवेलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 05:54 IST

रायगड सुरक्षा मंडळाची भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी रोडपाली येथील पोलीस मुख्यालयात सुरू आहे. या प्रक्रियेसाठी राज्यभरातील उमेदवार पनवेलमध्ये आले होते.

- वैभव गायकरपनवेल : रायगड सुरक्षा मंडळाची भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी रोडपाली येथील पोलीस मुख्यालयात सुरू आहे. या प्रक्रियेसाठी राज्यभरातील उमेदवार पनवेलमध्ये आले होते. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सुरक्षा मंडळाच्या भरतीसाठी तरुणांमध्ये चढाओढ सुरू आहे.राज्यातील सातारा, सांगली, जळगाव, कराड, पुणे, नाशिक आदी ठिकाणांहून तरुण-तरुणी या भरतीसाठी पनवेलमध्ये दाखल झाले होते. डिसेंबर २ ते ११ दरम्यान ही रायगड सुरक्षा मंडळाच्या भरतीपूर्व परीक्षा चालणार आहे. १००० जागांसाठी शारीरिक चाचणी सुरू असून, त्याकरिता रायगड सुरक्षा महामंडळाकडे सुमारे १२ हजार अर्ज केले होते. त्यापैकी ६५०० अर्ज वैध ठरले आहेत. यापैकी केवळ एक हजार जणांची निवड केली जाणार आहे.सातारा जिल्ह्यातील कराड येथून आलेल्या संतोष जाधव या उमेदवाराची शारीरिक चाचणी गुरुवारी झाली. पाच वर्षांपासून तो नोकरीच्या शोधात असून पोलीस, सैनिक भरतीमध्येही त्याने सहभाग नोंदवला होता. मात्र, निवड झाली नाही. कळंबोलीतील नातेवाइकाकडे तो थांबला आहे. त्याने शारीरिक चाचणी यशस्वीपणे पार केली आहे. मात्र, आॅनलाइन पद्धतीने भरती केली जाणार असल्याने निकाल उशिराच कळणार असल्याचे तो सांगतो.भविष्यात पनवेल शहराची व्याप्ती वाढणार आहे. त्यामुळे विविध आस्थापनांना रायगड सुरक्षा मंडळाच्या वतीने त्यांना सुरक्षारक्षक पुरविणार आहे. भरतीप्रक्रियेसाठी पुणे येथील तरुणदेखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आले होते. किशोर केदारे हा तरुण पुण्याहून भरती प्रक्रियेसाठी आला होता. पोलीस होण्याचे स्वप्न बाळगणारा किशोर भेटेल ती नोकरी करण्याच्या तयारीत आहे.सूरज फडके हा बोनशेतचा रहिवासी असून, स्थानिक तरुणांपेक्षा बाहेरगावांहून आलेल्या उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक तरुणांकडे निवासाची व्यवस्था नसताना बसस्थानक तसेच रेल्वे स्थानकावरच त्यांनी आश्रय घेतला.भरती प्रक्रियेत जिल्ह्याबाहेरील तरुणांची संख्या अधिक आहे. ११ डिसेंबरपर्यंत शारीरिक चाचणी होणार असून, अद्याप उमेदवारांचा ओघ सुरूच आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही चाचणी सुरू आहे. केवळ एक हजार जागा रायगड सुरक्षा मंडळ भरणार असल्याने उमेदवारांमध्ये मोठी स्पर्धा आहे.- आनंद भोसले,अध्यक्ष,रायगड सुरक्षा मंडळ

टॅग्स :panvelपनवेल