शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकापाठोपाठ जि.प. सदस्यालाही अटक वैद्यकीय अधिकारी मृत्यूप्रकरण : एक दिवसाची पोलीस कोठडी

By admin | Updated: February 24, 2016 00:42 IST

पिंपळगाव बुद्रूक, ता.भुसावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍याच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपी जि.प. सदस्य संजय पाटील यास पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.

जळगाव : पिंपळगाव बुद्रूक, ता.भुसावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍याच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपी जि.प. सदस्य संजय पाटील यास पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.पिंपळगाव बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त असलेले डॉ.दिनेश अमृत पाटील (२८, रा.हरेश्वरनगर, जळगाव) यांनी सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी ईश्वर भागवत पवार (रा.श्रीरामनगर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जि.प. सदस्य संजय पाटील (रा.दर्यापूर, ता.भुसावळ), नितीन निवृत्ती माळी (रा.वरणगाव), अविनाश सुरेश चौधरी (रा.पिंपळगाव बुद्रूक) व सुपडू उखा पाटील (रा.पिंपळगाव बुद्रूक) यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी दुपारी संजय पाटील यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारकडून ॲड.हेमंत मेंडकी यांनी काम पाहिले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी नितीन माळी यास सोमवारी पोलिसांनी अटक केली होती. त्याची कोठडी संपल्याने मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.