पेन्शनर्सचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे सहकार्य कार्यक्रम : दिनकर जगदाळे यांचे प्रतिपादन
By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST
लातूर : पेन्शनर्सचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे पूर्णपणे सहकार्य राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी बुधवारी केले़
पेन्शनर्सचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे सहकार्य कार्यक्रम : दिनकर जगदाळे यांचे प्रतिपादन
लातूर : पेन्शनर्सचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे पूर्णपणे सहकार्य राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी बुधवारी केले़लातूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन आणि लातूर तालुका शाखेच्या वतीने शहरातील कोरे गार्डन येथे पेन्शनर्स डे साजरा करण्यात आला़ त्याप्रसंगी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष डॉ़ जी़ वाय़ आष्टके होते़ यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दयानंद निमकर, शिक्षणाधिकारी राठोड, कोषागार अधिकारी अण्णाराव भुसणे, माजी खासदार डॉ़ जनार्दन वाघमारे, शिवशंकरप्पा खानापूरे, बळीराम गायकवाड यांचे मार्गदर्शन झाले़ प्रास्ताविक अष्टके यांनी केले़ सूत्रसंचालन के़एस़ पोपडे यांनी केले़ अशोक चाकूरकर यांनी आभार मानले़ यशस्वीतेसाठी डॉ़ अष्टके, सचिव के़एस़मानकर, उपाध्यक्ष अशोक कुलकर्णी, शिवराज पोस्ते, सहसचिव करबसप्पा पोपडे, कोषाध्यक्ष शंकरराव कोमटे तसेच एम़जी़मरळे, जी़के़ मिरजगावे, डॉ़ पैैके आदींनी परिश्रम घेतले़