शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

तरुण मतदारांना हवे केजरीवालांसारखे नेतृत्व

By admin | Updated: April 3, 2016 03:52 IST

आसाममधील तरुण मतदार येत्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या बदलाची अपेक्षा करीत असून आपल्या राज्यासाठी त्यांना सर्वंकष विकास आणि सर्व धर्मांच्या कल्याणासाठी काम करणारे

तेलपूर (आसाम) : आसाममधील तरुण मतदार येत्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या बदलाची अपेक्षा करीत असून आपल्या राज्यासाठी त्यांना सर्वंकष विकास आणि सर्व धर्मांच्या कल्याणासाठी काम करणारे शेजारील त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेतृत्व हवे आहे. राज्यातील युवा मतदार आणि प्रामुख्याने प्रथमच मतदानाचा अधिकार बजावण्यास आतुर असलेल्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तेजपूर विद्यापीठात शिकणारी उद्दीपना गोस्वामी म्हणाली, आम्हाला बदल हवा आहे हे निश्चित; परंतु तो चांगला असावा. भाजप अशा बदलाचा दावा करीत असला तरी अलीकडच्या काळातील काही घटनांमुळे चिंता वाढली आहे. आसाममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवेश, प्रादेशिकवादावर राष्ट्रवाद थोपणे आणि सांप्रदायिक भेदभाव निर्माण होण्याच्या भीतीमुळे विद्यार्थी सतर्क झाले आहेत, असाही दावा तिने केला, तर भाजपचा प्रचार केवळ तरुण गोगोर्इंविरुद्ध असून आपल्या योजना काय आहेत हे मात्र या पक्षाने स्पष्ट केले नसल्याचे मत सुकन्या मजुमदारने मांडले. दरांग महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या हिमांका फुकन याने सांगितले की, भाजप सत्तेत आल्यास धोका निर्माण होऊ शकतो; पण आम्ही हा धोका पत्करण्यास तयार आहोत, कारण आम्हाला बदल पाहिजे आहे. फुकनची वर्गमैत्रीण मयुरी बोरा ही मात्र त्याच्या मताशी सहमत नाही. काँग्रेसच्या तीन वर्षांच्या शासनकाळात आसाममध्ये काहीच विकास झाला नाही असे म्हणणे चुकीचे आहे; पण बदलत्या काळासोबत लोकांना गतिमान विकास अपेक्षित आहे, असे ती म्हणाली.