चंदीगड : तो आठवीत अनुत्तीर्ण झाला; पण २१ वर्षांचा हाच तरुण आज सायबर क्राईम रोखण्याच्या दिशेने पोलिसांना प्रशिक्षण देतो आहे़ लुधियाना येथील त्रिशजित अरोरा हा सायबर क्राईम सिक्युरिटी एक्स्पर्ट सध्या पंजाब आणि गुजरात पोलिसांना प्रशिक्षण देत आहे़ आॅनलाईन फसवणुकीसह सायबर क्राईमच्या प्रकरणांचा छडा लावण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या टीप्स तो देत आहे़ विशेष म्हणजे त्रिशजितच्या घरी संगणकविषयक कुठलीही पार्श्वभूमी नाही़ तरीही २०१२ मध्ये त्याने स्वत:ची कंपनी काढली़ डाटा चोरी, हॅकिंग किंवा अन्य क्राईमसंदर्भात कॉर्पोरेट कंपन्यांना सुरक्षा पुरविण्याचे काम त्याची कंपनी करते़ (वृत्तसंस्था)
तरुण हॅकर्स देत आहेत पोलिसांना प्रशिक्षण
By admin | Updated: December 15, 2014 02:55 IST