शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा ‘योग दिनी’ सूर्यनमस्काराचा समावेश नाही

By admin | Updated: June 10, 2016 04:15 IST

यंदा २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात ‘सूर्यनमस्कार’ आसनाचा समावेश नसेल.

नवी दिल्ली : यंदा २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात ‘सूर्यनमस्कार’ आसनाचा समावेश नसेल. योग ‘ॐ’च्या उच्चारणाशिवाय पूर्ण होत नाही. तथापि, नसले तरीही यंदा तेही अनिवार्य नसेल, असे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले.मागच्या वर्षीही ‘सूर्यनमस्कार’ या आसनाचा समावेश करण्यात आला नव्हता. सूर्यनमस्कार किचकट असून, नवीन लोकांसाठी ते ४५ मिनिटांत करणे जमत नाही. त्यामुळे आम्ही सूर्यनमस्काराचा समावेश केलेला नाही, असे सांगून त्यांनी ‘ॐ’चा घोषउच्चारण अनिवार्य करण्यात आलेले नाही, हेही नमूद केले.काही चांगले काम होत असेल, तर त्याला विरोध होत असतो. या वर्षी मात्र याला विरोध झालेला नाही. आम्ही याला अनिवार्य केलेले नाही. विरोध करणाऱ्यांना आम्ही समजावून सांगितले आहे. त्यांना पटल्याचे दिसते. विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठ आणि महाविद्यालयांना योगासंदर्भात आयुष मंत्रालयाच्या रूपरेषेचे पालन करण्याचे निर्देश दिले, तेव्हा वाद झाला होता, असे ते म्हणाले.आयुष मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘विविध शाळांमध्ये इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत शारीरिक शिक्षणात योगाचा समावेश करण्यात आला आहे, परंतु अनिवार्य करण्यात आलेले नाही.’केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी सर्व शाळांना योगाचा समावेश करण्यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे. अनेक शाळांनी योगाचा समावेश केला असून, अन्य शाळांमध्येही या दृष्टीने काम प्रगतीपथावर आहे, असेही नाईक म्हणाले. योग दिन साजरा करण्यासाठी अंदाजे किती खर्च लागेल, असे विचारले असता, आयुष मंत्रालयाचे सचिव अजित शरण यांनी सांगितले की, ‘सर्वच बाबींचा विचार केल्यास एकूण सर्व खर्च शेकडो कोटींच्या घरात जाईल, परंतु आयुष मंत्रालयाच्या मते जवळपास १५ कोटी खर्च येईल.’ (प्रतिनिधी)>सुट्टीबाबत मागणी झाल्यास पंतप्रधानांना विनंती करणार..२१ जून रोजी सार्वजनिक सुट्टी घोषित करणार का? यावर नाईक म्हणाले की, ‘त्याची गरज नाही. तशी कोणीही मागणी केलेली नाही. योगाची वेळ सकाळी असते. तेव्हा सार्वजनिक सुट्टीची गरज नाही. मात्र, अशी मागणी आल्यास मी पंतप्रधानांना सार्वजनिक सुट्टी घोषित करण्याची विनंती करेन. या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी (२१ जून) रोजी येतो. मागच्या वर्षी तो रविवारी होता.’