शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी कांदा रडवणार नाही

By admin | Updated: March 31, 2016 03:25 IST

यावर्षी देशात कांद्याचे उत्पादन वाढणार असून, त्यामुळे तो यंदा महाग होणार नाही. सणासुदीच्या काळात तर तो अजिबातच रडवणार नाही.

नवी दिल्ली : यावर्षी देशात कांद्याचे उत्पादन वाढणार असून, त्यामुळे तो यंदा महाग होणार नाही. सणासुदीच्या काळात तर तो अजिबातच रडवणार नाही.कृषी, सहकार व शेती कल्याण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीप्रमाणे यंदा देशात कांद्याचे उत्पादन नऊ टक्क्यांनी वाढणार आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण १0 टक्के असेल. गेल्या वर्षी म्हणजे २0१४-१५ मध्ये देशात कांद्याचे उत्पादन १८ हजार ९२७ टन इतके होते. त्याच्या आदल्या वर्षीच्या तुलनेत ते केवळ तीन टक्क्यांनी कमी होते. तरीही शेतकऱ्यांनी साठेबाजी आणि टंचाई निर्माण केल्याने परदेशातून कांदा आयात करावा लागला होता. यावर्षी फेब्रुवारीपर्यंत २0 हजार ३३४ टन कांदा उत्पादन झाले आहे. मार्चपर्यंत ते २0 हजार ६३0 टनापर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी ५३६१ टन कांद्याचे उत्पादन झाले. यंदा ते ५८0३ टनावर जाईल, असा अंदाज आहे. तेलंगणातही कांद्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही कांदा उत्पादनवाढीच्या वृत्ताला दुजोरा दिला. यंदा उत्पादन चांगले असून, भावही नीट मिळत आहे. मात्र काही दलाल या व्यवहारात गडबड करू पाहत आहेत, असे ते म्हणाले.केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द केल्याने शेतकरी आणि ग्राहक यांना त्रास होणार नाही, अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)