शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

याहू मेसेंजर बंद होणार !

By admin | Updated: June 13, 2016 22:31 IST

युझर्सनी ०५ ऑगस्ट २०१६ पूर्वी नवीन याहू मेसेंजर वापरायला सुरुवात करावी अन्यथा ०५ ऑगस्ट २०१६ नंतर तुमचे जुने याहू मेसेंजर वापरता येणार नाही.

अनिल भापकरयाहू मेसेंजर हे सगळ्यात जुन्या मेसेंजर पैकी एक आहे. १९९८ साली याहू पेजर या नावाने सुरु झालेला याहू मेसेंजरचा प्रवास भल्याभल्याना थक्क करणारा असच होता. एके काळी लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ असलेल्या मेसेंजर पैकी एक म्हणजे याहू मेसेंजर.युझर्सला स्वत:च्या चाट रूम तयार करता येणे तसेच वेगवेगळे इमोशन्स पाठविता येणे यामुळे नेटकरी लोकांमध्ये याहू मेसेंजरने एक वेगळे स्थान निर्माण केले होते.मात्र जसजसा काळ बदलला तसतसा मेसेंजर मध्ये स्पर्धा निर्माण होत गेली. फेसबुक मेसेंजर ,व्हॉट्सअ‍ॅप,आदी मेसेंजरच्या स्पर्धेत याहू मेसेंजर काहीसे मागे पडल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे याहू मेसेंजर चे अनेक युझर्स इतर मेसेंजरकडे शिफ्ट झाले. याचाच परिणाम म्हणून याहू मेसेंजरने स्वत:मध्ये अनेक बदल घडवत नवीन याहू मेसेंजर डिसेंबर २०१५ साली लॉंच केले. हे नवीन याहू मेसेंजर गुगल प्ले तसेच अ‍ॅप स्टोअर वर उपलब्ध आहे. आता मात्र याहूने त्यांचे १८ वर्ष जुने याहू मेसेंजर बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याजागी नवीन याहू मेसेंजर अधिक फीचर्स सह आणणार आहे. त्यासाठी याहूने युझर्स ला ०५ ऑगस्ट २०१६ पर्यंत नवीन याहू मेसेंजरला अपडेट होण्याचा सल्ला दिला आहे. ०५ ऑगस्ट २०१६ पर्यंतचे मेसेज अर्काइव करता येईल असे समजते . त्यानंतर मात्र जुन्या मेसेजला अक्सेस मिळणार नाही. तेव्हा याहू मेसेंजर वापरणाऱ्या युझर्सनी ०५ ऑगस्ट २०१६ पूर्वी नवीन याहू मेसेंजर वापरायला सुरुवात करावी अन्यथा ०५ ऑगस्ट २०१६ नंतर तुमचे जुने याहू मेसेंजर वापरता येणार नाही.