नाशिक : विश्वकर्मा ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांचे आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच घेण्यात आले. त्यात ५५ पुरुष व ४५ महिलांनी लाभ घेतला. साद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे न्यूरो सर्जन डॉ. मिलिंद वैद्य, डॉ. गौरी पिंप्राळेकर यांनी शिबिरार्थींना विविध आजार व त्यापासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे कार्याध्यक्ष अरविंद जाधव, सुषमा राजगुरू यांच्या हस्ते डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मुरलीधर पेंढारकर, मंजुळा गाडेकर, दशरथ शिरसाठ, शंकर शिरसाठ, सुधाकर पगार, बाळासाहेब दिघे, निवृत्ती बोराडे, रत्ना खैरनार आदि उपस्थित होते.
ॅविश्वकर्मा संघटनेचे आरोग्य शिबिर
By admin | Updated: June 3, 2015 00:19 IST