शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयांसाठी कार्यकर्त्यांची धावपळ

By admin | Updated: September 24, 2014 02:59 IST

निवडणुकांची लगबग सुरू झाली की, कार्यकर्त्यांच्या बैठकादेखील वाढू लागतात. या वेळी कार्यकर्त्यांची हक्काची जागा म्हणजे निवडणुकीसाठी उभारलेली तात्पुरती कार्यालये

मुंबई : निवडणुकांची लगबग सुरू झाली की, कार्यकर्त्यांच्या बैठकादेखील वाढू लागतात. या वेळी कार्यकर्त्यांची हक्काची जागा म्हणजे निवडणुकीसाठी उभारलेली तात्पुरती कार्यालये. सक्रिय कार्यकर्ते निवडणुकीच्या काळात सकाळपासून रात्रीपर्यंत कार्यालयातच असतात. मात्र सध्या ही कार्यालये शोधण्यासाठी, उभारण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे.निवडणुकीच्या दरम्यान सर्वच उमेदवार मतदारसंघामध्ये मुख्य निवडणूक कार्यालय स्थापन करतात. मात्र याचबरोबरीने सर्वच मतदारसंघ मोठे असल्यामुळे त्या - त्या भागात छोटी छोटी कार्यालये स्थापन करण्यात येतात. सर्वच मतदारांशी संपर्क राहावा म्हणून अशा प्रकारच्या तात्पुरत्या स्वरूपाची कार्यालये स्थापन करण्यात येतात. मात्र अजूनही मुंबईमध्ये अशा कार्यालयांसाठी शोधाशोध सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. निवडणुकीच्या काळात त्या उमेदवाराचा जनसंपर्क जास्त प्रमाणात वाढतो. यामुळेच उमेदवार विधानसभा मतदारसंघाच्या मध्यभागी असणाऱ्या ठिकाणावर त्यांचे कार्यालय असावे, यासाठी प्रयत्न करीत असतात. एका विधानसभा मतदारसंघातून प्रमुख पक्षाचे ३ ते ४ उमेदवार असतात. या सर्वांनाच मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय हवे असते. संपर्क कार्यालयांची जागा आता निश्चित झालेली आहे. मात्र उपकार्यालयांसाठी जागा शोधण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. उपकार्यालये ही प्रामुख्याने त्या विभागातील मतदारांशी संपर्क राहावा, त्यांना उमेदवाराचे नाव, पक्ष डोळ्यांसमोर राहावा यासाठी उभारली जातात. जागा आणि त्याचे भाडे या मुद्द्यावरून आता कार्यकर्ते वाटाघाटी करताना दिसत आहेत. दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगरे येथील जागांचे भाडे हे उत्तर आणि पूर्व मुंबई भागातील जागांपेक्षा जास्त आहे.