शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

सचिवाच्या सल्ल्याप्रमाणे काम केले!

By admin | Updated: October 4, 2015 23:34 IST

तत्कालीन कोळसा सचिव पी.सी. पारेख यांच्या सल्ल्यानुसार कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला तालाबिरा-२ कोळसा खाणपट्टा वितरित करण्याची ओडिशाचे मुख्यमंत्री

नवी दिल्ली : तत्कालीन कोळसा सचिव पी.सी. पारेख यांच्या सल्ल्यानुसार कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला तालाबिरा-२ कोळसा खाणपट्टा वितरित करण्याची ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची विनंती आपण मंजूर केलेली होती आणि त्याची पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनीही तपासणी केली होती, असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सीबीआयला सांगितले.हिंदाल्कोला कोळसा खाणपट्टा वाटप न करण्याच्या निर्णयाची समीक्षा करण्याची विनंती पटनायक यांनी आपल्या पत्रातून केली होती आणि त्यांच्या या पत्रामुळेच हे प्रकरण उघडण्यात आले होते, असे मनमोहनसिंग यांनी स्पष्ट केले. ‘पंतप्रधान या नात्याने आपणास पाठविण्यात आलेल्या पटनायक यांच्या १७ आॅगस्ट २००५ रोजीच्या पत्रात मेसर्स हिंदाल्कोच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी केवळ आवश्यक असलेली कोळसा लिंकेज उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आलेली होती; परंतु हा कोळसा खाणपट्टा आधीच वाटप करण्यात आलेला होता. अशा वेळी आपण तालाबिरा-२ कोळसा खाणपट्ट्यात हिंदाल्कोला भागीदारी देण्यासाठी मंजुरी का दिली,’ असा प्रश्न तालाबिरा-२ कोळसा खाणपट्टा वाटप घोटाळ्याच्या तपासादरम्यान सीबीआयने मनमोहनसिंग यांना विचारला होता.हिंदाल्कोला कोळसा खाणपट्टा वाटप न करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्यात यावा, अशी विनंती बिर्ला यांनी एका पत्राद्वारे सरकारला केली होती. त्यानंतर पटनायक यांनी निर्णयाची समीक्षा करण्याची विनंती करणारे पत्र लिहिले होते. विशेष न्यायालयाने सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकृत करण्यास नकार देताना मनमोहनसिंग, पारेख, बिर्ला आणि अन्य व्यक्तींना आरोपी म्हणून समन्स जारी केला होता. तथापि, या सर्वांनीच गैरप्रकार झाल्याच्या आरोपाचे खंडन केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)