शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
3
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
4
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
5
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
6
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
7
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
8
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
9
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
10
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
11
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
12
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
13
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
14
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
15
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
16
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
17
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
18
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
19
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
20
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी

महिला आणि मुलांचा जणू विसरच!

By admin | Updated: February 1, 2017 19:32 IST

‘जेण्डर बजेट’ नावाच्या संकल्पनेचं या अर्थसंकल्पाला पुर्णत: विस्मरण झालेलं दिसतं आहे. युवा, शिक्षण, कौशल्यविकास

- अ‍ॅड. जाई वैद्य (ज्येष्ठ विधीज्ञ आणि स्त्री-प्रश्नांच्या अभ्यासक)

मुंबई, दि. 1 - ‘जेण्डर बजेट’ नावाच्या संकल्पनेचं या अर्थसंकल्पाला पुर्णत: विस्मरण झालेलं दिसतं . युवा, शिक्षण, कौशल्यविकास, ग्रामविकास या संकल्पनांवर भर देताना त्यात महिलांसाठी काहीही विशेष तरतूदींचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही.महिलेच्या नावानं एलपीजी कनेक्शन देणं, गर्भवती महिलेच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करणं, मक इन इंडियामध्ये अनुसुचित जाती जमातींसह महिलांना सवलती यांचं स्वागत करायला हवं. मात्र तेवढंच पुरेसं नाही. प्रत्येक योजनेंतर्गत महिलांचा विचार किंवा त्यांना ठोस सवलती, तरतूदी द्यायला हव्या होत्या. मात्र तसं झालेलं दिसत नाही. महिलांसह बालकांसाठीही या अर्थसंकल्पात काही विशेष तरतूदी नाहीत. विमा योजनेत ज्येष्ठांचा समावेश केला गेला असे दिसते मात्र त्यातही महिला, अपंग मुलं, त्यांची देखभाल यांच्यासाठीही सवलती दिल्या गेलेल्या नाहीत. महिला उद्योजकांना पाठबळ, प्रोत्साहन मिळेल म्हणून काही विशेष करसवलत किंवा अन्य सवलती देण्यात आलेल्या नाहीत. लघुउद्योगांत महिला उद्योजिकांचं प्रमाण मोठं आहे, तिथं महिलांसाठी निर्माण होणाऱ्या रोजगारांचं प्रमाणही मोठं आहे मात्र त्यासाठीही या अर्थसंकल्पानं काहीही दिलेलं नाही. पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्याची घोषणा असली तरी महिलांना त्याचा लाभ मिळेल अशी काहीही तरतूद नाही. देशातल्या ४८ टक्के महिला लोकसंख्येसाठी काहीही वेगळा विचार करावा असं या अर्थसंकल्पाला वाटलेलं नाही असं म्हणायचं का, असाच खरा प्रश्न आहे.