वोक्हार्ट हॉस्पिटलला रुग्ण सुरक्षेचा आशियाई पुरस्कार
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
नाशिक : रुग्ण सुरक्षेसंदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन आणि कार्याबद्दलचा आशियाई पातळीवरचा सवार्ेत्कृष्ट पुरस्कार वोक्हार्ट हॉस्पिटलच्या नाशिक शाखेला मिळाला आहे. सीएमओ आशिया, वर्ल्ड सीएसआर डे आणि एशियन कॉन्फेडरेशन ऑफ बिझनेस यांच्या वतीने आरोग्य सुरक्षाविषयक पुरस्कार दिले जातात. त्याअंतर्गत नाशिकच्या वोक्हार्ट हॉस्पिटलची रुग्ण सुरक्षा विभागातील कार्यासाठी निवड करण्यात आली. पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे पार पडला.
वोक्हार्ट हॉस्पिटलला रुग्ण सुरक्षेचा आशियाई पुरस्कार
नाशिक : रुग्ण सुरक्षेसंदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन आणि कार्याबद्दलचा आशियाई पातळीवरचा सवार्ेत्कृष्ट पुरस्कार वोक्हार्ट हॉस्पिटलच्या नाशिक शाखेला मिळाला आहे. सीएमओ आशिया, वर्ल्ड सीएसआर डे आणि एशियन कॉन्फेडरेशन ऑफ बिझनेस यांच्या वतीने आरोग्य सुरक्षाविषयक पुरस्कार दिले जातात. त्याअंतर्गत नाशिकच्या वोक्हार्ट हॉस्पिटलची रुग्ण सुरक्षा विभागातील कार्यासाठी निवड करण्यात आली. पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे पार पडला.रुग्णांच्या सुरक्षिततेसंबंधी व्यवस्थापन, प्रक्रिया आणि परिणाम यासंदर्भात वोक्हार्ट हॉस्पिटल सातत्याने काम करत आहे. या संपूर्ण उपक्रमात हॉस्पिटलची नाशिक शाखा सुरुवातीपासूनच सहभागी आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल करून घेण्यापासून त्याला डिस्चार्ज देईपर्यंत राबविण्यात येणारी काटेकोर व सुरक्षित प्रक्रिया या पुरस्कारासाठी पात्र ठरली. त्यात शस्त्रक्रिया करताना पाळण्यात येणार्या सुरक्षिततेच्या उपायांपासून ते हॉस्पिटलमध्ये राबविण्यात येणार्या औषध सुरक्षा सप्ताहासारख्या विविध उपक्रमांचीही दखल घेण्यात आली.हॉस्पिटलच्या वतीने डॉ. किरणदीप संधू यांनी प्रतिनिधित्व केले. बंगळुरू येथील फोर्टिस हॉस्पिटल, अपोली डेंटल व्हाईट, पी. डी. हिंदूजा नॅशनल हॉस्पिटल, कोकिलाबेन धिरूभाई अंबानी हॉस्पिटल आदि हॉस्पिटलमधून नाशिकच्या वोक्हार्ट हॉस्पिटलची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली.हॉस्पिटलच्या नाशिक केंद्राचे प्रमुख डॉ. अविनाश अगरवाल, डॉ. महेश पडवळ, डॉ. किरणदीप संधू, डॉ. पूजा ए. मोघे आणि त्यांचे सहकारी रुग्ण सुरक्षेबाबतचे सर्व निकष काटेकोरपणे पाळले जावेत यासाठी दक्ष असतात. त्यांना डॉ. क्लाइव्ह फर्नांडिस आणि मिस विजयरानी दुराईराज यांचे नेहमीच प्रोत्साहन, मार्गदर्शन व पाठिंबा असतो.(वा. प्र.)