शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला विजयी करा आणि सरकारी नोकरी मिळवा

By admin | Updated: July 14, 2016 03:08 IST

पंजाबमधील अकाली दल-भाजपाच्या सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी आतूर असलेल्या काँग्रेसच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा आहे

नवी दिल्ली : पंजाबमधील अकाली दल-भाजपाच्या सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी आतूर असलेल्या काँग्रेसच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा आहे, केजरीवालांचा आम आदमी पक्ष. काँग्रेसचे रणनीतीकार प्रशांत किशोर आणि कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी या समस्येवर मात करण्यासाठी राज्यात प्रत्येक गरजवंत कुटुंबाला एक सरकारी नोकरी देण्याच्या आश्वासनाचा आक्रमक डाव खेळायचे ठरवले आहे.केजरीवालांच्या ‘आप’ ने तरुणांवर मोहिनी घालणारे अनेक प्रयोग पूर्वीच सुरू केले आहेत. काँग्रेसने अमरिंदरसिंगांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निश्चित केल्यानंतर ‘कॉफी वुइथ कॅप्टन’, ‘प्रत्येक मतदारसंघात कॅप्टन’ यासारख्या कार्यक्रमांचा धूमधडाका उडवून दिला. या कार्यक्रमातून, तसेच निरनिराळ्या सर्वेक्षणातून एकच महत्त्वाचा प्रश्न काँग्रेसच्या लक्षात आला, पंजाबमधील बेरोजगारीची समस्या. त्यामुळे काँग्रेसने आता निवडणूक प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवण्याचे ठरवले आहे. प्रत्येक मतदानकेंद्रासाठी युवक काँग्रेसचे दोन कार्यकर्ते तयार केले आहेत. हे कार्यकर्ते सध्या एक छापील फॉर्म घेऊन त्यांना ठरवून दिलेल्या मतदानकेंद्राच्या क्षेत्रातील मतदारांच्या घरोघरी फिरत आहेत. घरात सुशिक्षित बेरोजगार किती? मुलगा आहे की मुलगी? त्यांची शैक्षणिक पात्रता काय? सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे काय? पूर्वी किंवा सध्या घरातले कोणी सरकारी नोकरीत होते किंवा आहे काय? असे प्रश्न व फॉर्म भरणाऱ्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाइल नंबर या फॉर्ममध्ये आहेत. फॉर्म भरल्याची पोचही देण्यात येते.पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या नशेशी झुंज देणाऱ्या तरुणांना रोजगार देण्याचे अभिवचन आम आदमी पक्षाने या पूर्वी दिले. त्यावर मात करण्यासाठी गरजू कुटुंबात प्रत्येकी बेरोजगाराला सरकारी नोकरीत सामावून घेण्याचे वचन आपल्या प्रचारात आणि जाहीरनाम्यात काँग्रेस देणार आहे.यातून काँग्रेस दोन गोष्टी साध्य करणार आहे. एक तर बेरोजगार तरुणांमध्ये सरकारी नोकरीची आकांक्षा निर्माण करणे आणि दुसरे म्हणजे बेरोजगारांचा अद्ययावत डेटाबेस तयार करणे. निवडणूक प्रचारात व्हॉटसअ‍ॅप, ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेस या डेटाबेसद्वारे तरुणांशी संवाद साधणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही पक्षातर्फे याच मुद्द्यावर सर्वाधिक भर देण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)