शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही मिळणार ‘आयडीएस’चा लाभ

By admin | Updated: January 18, 2017 01:09 IST

उत्पन्न प्रकटीकरण योजनेच्या (आयडीएस) नियमात कर विभागाने अल्पशी सुधारणा केली

नवी दिल्ली : उत्पन्न प्रकटीकरण योजनेच्या (आयडीएस) नियमात कर विभागाने अल्पशी सुधारणा केली असून ५ डिसेंबरपर्यंत कर भरला गेला असेल तरी या योजने अंतर्गत जाहीर केलेले बेहिशेबी उत्पन्न वैध धरले जाणार आहे. या आधी करांचा पहिला हप्ता भरण्यची मुदत ३0 नोव्हेंबर ठेवण्यात आली होती. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने चार महिन्यांची आयडीएस योजना जाहीर केली होती. तिची मुदत ३0 सप्टेंबर २0१६ पर्यंत होती. योजने अंतर्गत देशातील काळा पैसा बाळगणाऱ्यांना ४५ टक्के कर आणि दंड भरून स्वच्छ होण्याची संधी देण्यात आली होती. या योजनेत जाहीर करण्यात आलेल्या काळ््या पैशावरील कराचा पहिला हप्ता ५ डिसेंबर २0१६ पर्यंत भरता गेला असेल तरी तो वैध धरण्यात येणार आहे. प्राप्तिकर विभागाने देशातील सर्व कर आयुक्तांना यासंबंधीचे निर्देश जारी केले आहेत. सीबीडीटीने म्हटले की, अनेक प्रकरणांत करांचा भरणा धनादेश, आरटीजीएस आणि इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण यंत्रणेद्वारे करण्यात आला. यात कर भरणा ३0 नोव्हेंबर २0१६ अथवा त्याआधी केला आहे, तरीही प्रत्यक्षात बँकांकडून हे पैसे क्रेडिट व्हायला उशीर झाला. त्यात ३0 नोव्हेंबरनंतर पैसे क्रेडीट झाले. या तांत्रिक चुकीची दुरुस्ती म्हणून ५ डिसेंबर २0१६ पर्यंत क्रेडिट झालेले पैसे ग्राह्य धरले जाणार आहेत. ५ डिसेंबरनंतर क्रेडिट झालेले पैसे मात्र ग्राह्य धरले जाणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)